spot_img
spot_img

मुलगी पहायला गेले आणि लग्न लावून आले,शेकडे कुटुंबांनी घातला समाजासमोर आदर्श

देवळाली(वार्ताहर)सध्या सर्वत्र लग्नाची धामधूम सुरू आहे. आजच्या काळात लग्नसमारंभ मोठ्या थाटात करण्याची पद्धत रूढ झाली आहे. सध्या समाजात तर लग्नसमारंभावर लाखो रुपये खर्च केले जातात. पण शेकडे आणि आघाव परिवारातील सदस्य तथा शिक्षित दाम्पत्याने बडेजावपणा व अनावश्‍यक खर्चाला फाटा देत “चट मंगनी पट ब्याह’ करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. देवळाली येथील मुरलीधर शेकडे(मुकादम) यांचे सुपुत्र पांडुरंग हे उच्चशिक्षित असून, त्यांच्यासाठी मुलगी पाहायला आघाव परिवाराच्या निमंत्रणावरून रविवार (ता.२६) बोधेगावला आले होते. अंकुश आघाव (बोधेगाव) यांची मुलगी प्रतिभा दोघांनीही एकमेकांना पसंत केले. दोन्ही परिवाराचीही पसंती झाली आणि त्यातूनच अवाजवी खर्च आणि वेळ वाया घालविण्यापेक्षा लागलीच लग्न लावून देण्यास काय हरकत आहे? असा प्रस्ताव समोर आला. दोन्ही परिवारांनी त्याला होकार दिला आणि अवघ्या दोन तासांतच कौटुंबिक वातावरणात मोजक्‍या समाजबांधवांच्या व आप्तेष्टांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने पांडुरंग आणि प्रतिभा विवाहबद्ध झाले. यावेळी ह.भ.प.आदिनाथ महाराज शास्त्री (तारकेश्वरगड) ह.भ.प.आदिनाथ महाराज आंधळे,ह.भ.प.काशिनाथ महाराज यांनी वधू-वरास आशीर्वाद देत समाजातील दोन्ही परिवारांनी वेळ,श्रम व पैशांची बचत करून समाजात एक नवीन आदर्श निर्माण केला असल्याचे यावेळी सांगितले व समाजाला आता अशा प्रकारच्या विवाहांची गरज असून, शेकडे व आघाव परिवाराचे अभिनंदन व कौतुक केले.या आदर्श विवाहासाठी महाराष्ट्र राज्य प्रदुषण आयुक्त खेडकर साहेब देवळालीचे सरपंच पोपटराव शेकडे, बाबासाहेब शेकडे, नवनाथ शेकडे, रमेश तांदळे (उपसभापती) नवनाथ तांदळे (मा.जि.प.सदस्य) साहेबराव डमाळे(मुकादम) सुभाष गर्जे,अजिनाथ गर्जे,ज्ञानोबा गर्जे,दत्तोबा तळेकर,इंजिनिअर सुभाष तळेकर,शैलेश मोहिते (मा.सरपंच)बंडु तळेकर (मा.सरपंच) दिलीप तांदळे,उमेश तांदळे, आदिनाथ शेकडे (मा.सरपंच)म्हातारदेव हरीभाऊ शेकडे,मिठु सर शेकडे,झांजे सर, मच्छिंद्र पवार सर,शहादेव शेकडे, तुकाराम महाराज, मल्हारी पालवे,सुर्यभान महाजन,भाऊ साहेब महाजन, नवनाथ महाजन, सोमनाथ शेकडे,बाळु शेकडे, गौतम शेकडे, अशोक तांदळे, संतोष तांदळे, अशोक तांदळे सर, बाबासाहेब तांदळे,मच्छिंद्र तांदळे, अशोक खाडे, दत्तोबा तांदळे, सुधाकर तांदळे, महाराष्ट्र सुपरफास्टचे मुख्य संपादक अतुल जवणे, शिवाजी तांदळे, रविंद्र नागरे, विजय तांदळे, आनंद तांदळे, भरत हिंगणे,कल्याण तांदळे, असिम सय्यद सह राजकीय, धार्मिक,शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील आदी उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!