spot_img
spot_img

भाच्याने केले मामाच्या मुलीचे अपहरण! आष्टी पोलिस ठाणे हद्दीतील घटना;अपहरणाचा गुन्हा दाखल

कडा(प्रतिनिधी) – मित्रासह मामाच्या गावाकडे आलेल्या भाच्याने मामा,मामी घरी नसल्याची संधी साधत अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान घडली असुन बुधवारी आष्टी पोलिस ठाण्यात भाच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील एका गावातील भाचा आपल्या मित्रासह २२ नोव्हेंबर रोजी परिसरात टॅक्टरच्या व्यवहारासाठी आला होता.मग मामाचं घर जवळच असल्याने तो घरी गेला.पण मामा शेतात पाणी धरायला गेल्याने आजोबा व अल्पवयीन मुलगी दोघेच घरी होते.भाच्याने त्या अल्पवयीन मुलीला फुस लावत अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याचा प्रकार बुधवारी सकाळी शेतातून घरी आलेल्या मामाला समजताच त्यानी बुधवारी आष्टी पोलिस ठाणे गाठत भाच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार काळे करीत आहेत.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!