आष्टी (प्रतिनिधी )
छत्रपती संभाजीनगर येथे दोन महिन्यापूर्वी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आमदार बाळासाहेब आजबे यांच्या मागणीनुसार मंत्रिमंडळाने आष्टी येथे उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी दिली होती त्यानुसार आष्टी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणी वर्धन करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची सही होऊन अखेर आज30 खटांचे100 खाटास मंजुरीचा जि आर आज निघाल्याने उपजिल्हा रुग्णालयाच्या कामास मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून रेंगाळलेला आष्टी उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न आष्टी मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या प्रयत्नाने मार्गी लागलाअसून आमदार आजबे यांच्या पाठपुराव्यामुळे आज
जि आर आले आहे त्यामुळे आष्टी तालुक्यातील जनतेची होणारी हेळसांड कायमची थांबण्यास मदत होणार आहे उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कृषी मंत्री धनंजयजी मुंडे आरोग्यमंत्री तानाजी सावंत या सर्वांचे आष्टी मतदार संघाच्या वतीने आभार मानण्यात येत असल्याचेही शेवटी आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.