पाथर्डी (प्रतिनिधी):- कार्तिक एकादशी निमित्त आमदार मोनिकाताई राजळे यांची पैठण येथे गोदावरी स्वच्छता मोहिम
अहमदनगर दि 23/11/2023
कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे देवोत्थान एकादशी, या दिवशी परमपिता परमात्मा भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होऊन सृष्टीच्या कल्याणाचा आशीर्वाद देत सेवा कार्य करण्याची भाविकांना प्रेरणा देतात. वारकरी संप्रदाय याच सेवावृत्तीतून सर्वत्र रुजला आहे. खऱ्या अर्थाने सेवा हाच धर्म आणि स्वच्छता हीच ईश्वराची खरी सेवा मानून वैराग्यमूर्ती परम आदरणीय हरिभक्ती परायण पूजनीय राम झिंजुर्के महाराज पैठण येथे दर एकादशीला जाउन गोदावरीची स्वच्छता करण्याचा यांनी अत्यंत स्तुत्य व प्रेरणादायी उपक्रम हाती घेतला आहे.
पैठण येथील गोदावरी नदीच्या पात्रामध्ये प्रचंड घाण, दुर्गंधी, केर कचऱ्यामुळे तीर्थक्षेत्रे ही नरक क्षेत्र बनले आहेत,असे संतापाने भाविक म्हणतो. या उपक्रमामध्ये जिल्ह्याच्या राजकारणातील अध्यात्मिक वारसा तेवढ्याच ताकदीने चालवणाऱ्या व अंतर्मनातून सतत ईश्वराशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्य कुशल मितभाषी व अत्यंत तेजस्वी व्यक्तिमत्त्वाच्या आमदार आदरणीय मोनिकाताई राजळे यांनी या सेवा कार्यात प्रत्यक्ष सहभाग घेत पद ,प्रतिष्ठा, मोठेपणा, वेगळेपणा, असे सर्व सोपस्कार बाजूला ठेवत खऱ्या साधकाचे कर्तव्य पार पाडत पवित्र गोदामाईचा तट स्वच्छता करण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला. पूजा साहित्य, दशक्रिया विधीचे अन्न, अन्य टाकाऊ वस्तु, प्लास्टिकचा कचरा, गोळा करत सर्व भाविकांमध्ये एकरूप होत सर्व भेदाभेद दूर सारत अत्यंत श्रद्धेने सेवा केली. सेवा कार्याचा हा संस्कार बघून अनेक वारकऱ्यांनी अशा सहभागाचे अत्यंत तोंड भरून कौतुक केले. केवळ फोटो पुरते काम न करता सेवा युक्त अंतकरणाने जबाबदारीच्या भावनेतून केलेले काम खऱ्या अर्थाने एकादशीचे व्रत सफल करणारे ठरले आहे. सर्व धर्मांमध्ये देवाची शिकवण स्वच्छतेलाच असून बाह्य स्वच्छतेचा संस्कार मनामध्ये रुजवत अंतःकरणाची स्वच्छता संतांच्या व तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून करत ईश्वर तत्वाला पोहोचण्याची खरी प्रक्रिया महाराजांच्या अध्यात्मिक मार्गदर्शनातून आदरणीय ताईंनी सुरू केली आहे. याचा अभिमान सर्व धर्मप्रेमी बांधवांना निश्चितच आहे. तीर्थक्षेत्री जाऊन सेवा करण्याला मतदार संघाच्या सीमा असे बंधन न मानता हे विश्वचि माझे घर अशा उदात्त भावनेतून केलेली सेवा वारकरी संप्रदायाची शिकवण खऱ्या अर्थाने सार्थ ठरवणारी ठरली आहे. मनुष्याचे ईश्वरातील रूप स्वच्छतेच्या, पावित्र्याच्या, मांगल्याच्या व सात्विकतेच्या चौकटीतूनच पुढे जाते. अशी चौकट पार करत आदरणीय महाराजांनी आदरणीय ताईंना अध्यात्माचा सुंदर असा , कल्याणकारी ठरेल असा रस्ता, इतरांनी प्रेरणा घ्यावी असा तेजोमय रस्ता दाखवला आहे. धन्य ते संत, व धन्य त्या सार्वजनिक जीवनातील संत अशी उस्फूर्त प्रतिक्रिया गाव गावच्या वारकऱ्यांनी आज पैठण येथील वारीमध्ये असे सेवा कार्य बघून व्यक्त केली. हेतूची शुद्धता व कार्याची पवित्रता दोन्ही महनीय व्यक्तींनी आपल्या कृतीतून दाखवल्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनात असे उदाहरण क्वचितच आढळते.
राज्य शासनातील एखादा लोकप्रतिनिधी आदर्शाच्या एवढ्या उंचीवर जाऊ शकतो हे बघून शासनाची सुद्धा सर्वसामान्यांच्या मनात प्रतिमा उंचावली आहे. खऱ्या अर्थाने दोन्ही माननीय व्यक्तींना स्वच्छतेचा अर्थ अध्यात्माच्या मार्गातून कळाल्याने असा प्रेरणादायी उपक्रम राज्यातील लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यक्षेत्रात राबवल्यास सर्वजनिक जीवनातील घाण व संस्कार यातील दूषित वृत्ती नष्ट होण्यास निश्चित मदत होईल. पैठण येथील नदीकिनारी असलेले घाणीचे साम्राज्य बघून मनात सेवाभाव जागृत राहण्याऐवजी घृणा भाव वाढून तीर्थक्षेत्री अधिक वेळ व्यर्थ न घालता सर्वसामान्य माणूस बाहेर पडण्याची वाट धरतो. तीर्थक्षेत्राचे मूळ सौंदर्य आजच्या स्वच्छता मोहिमेने पूर्ण अर्थाने मिळणार नसली तरी सौंदर्य रुपी कार्याचे बीजारोपण गोदातीरी शांती ब्रह्म संत एकनाथांना म्हणजेच भगवान विष्णूंना साक्षी ठेवून झाल्याने या बीजाचा अंकुर अत्यंत वेगाने फोफावल्याशिवाय राहणार नाही,. असा विश्वास वाटतो . अशा या प्रेरणादायी कार्याने संत एकनाथांचे आशीर्वाद दोन्ही आदरणीय व्यक्तींना लाभुन पुण्य प्रधान करणारे ठरले आहे.
धर्म ग्रंथांमध्ये तीर्थक्षेत्री केलेले सत्कर्म अनेक पटींनी फलदायी ठरते पैठण या तीर्थक्षेत्राचे महात्म्य बघता अशा या कार्यातून मिळालेली ऊर्जा साधक व अनुयायांच्या कल्याणाअर्थ निश्चितच उपयोगाला येईल. आमदार मोनिकाताई राजळे यांनी आपल्या चौफेर कार्याच्या माध्यमातून मतदारांच्या मनाचा ठाव घेत चाललेली घोडदौड आणखी वेगळ्या उंचीकडे चालली आहे. पाथर्डी शेवगाव तालुक्यामध्ये आदरणीय झिंजुर्के महाराजांच्या संस्काराच्या विद्यापीठातून तयार झालेले शेकडो वारकरी आणि आदरणीय ताईंच्या कार्यपद्धतीतून तयार झालेले शेकडो कार्यकर्ते या दोघांमध्ये फारसा फरक उरलेला नाही