आष्टी ( प्रतिनिधी ):-
आष्टी मतदारसंघातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने शेतकऱ्यांचे नेते माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून आष्टी येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून चार दिवस हे कृषी विषयक प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी आनंदपर्वणी ठरणार आहे शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले आहे. आष्टी येथील आनंद भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी याबाबत माहिती दिली यावेळी छत्रपती , शाहू, फुले ,आंबेडकर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीराम आरसूळ उपस्थित होते..
पुढे बोलताना भीमराव धोंडे म्हणाले की
कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणारा हा आष्टी तालुका आहे. आणि या तालुक्यात कृषी प्रदर्शन घेण्याचे योग आपल्याला आला असून, आष्टी शहरात दि. २४ ते २७ डिसेंबर चार दिवस राज्यस्तरीय डॉ.स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले आहे .भारत देशामध्ये हरितक्रांतीचे जनक डॉ. स्वामीनाथन यांनी ग्रामीण शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी संशोधन करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले आणि शेती पूरक आणि शेतीचे महत्व देशासह जगाला दाखवून दिले आहे. म्हणून या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला ” डॉ. स्वामीनाथन कृषी प्रदर्शन “असे नाव देण्याचे आम्ही ठरविले असून,या प्रदर्शनामध्ये फळबाग भाजीपाला फुल शेती व वनौषधी कापूस ज्वारी गहू कडधान्य तेलबिया पाणलोट विकास ऊस पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय कृषी अभियांत्रिकी व अवजारे इत्यादी विभागां सोबतच छञपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आले असून, संस्था व शासनाच्या इतर विभागांची दालने असून, संस्था व शासनाच्या इतर विभागांची दालने राहणार आहेत.शेतकरी बंधूचे ग्रामीण विकासा संबंधी कृषी संलग्नित व्यवसाय व शेतीपूरक जोडधंदे तसेच कृषीमालाच्या प्रक्रिया उद्योगा विषयीची दालने कृषी प्रदर्शनीचे मुख्य आकर्षण ठरणार असुन कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांकरिता प्रेरणादायी ठरणार आहे. याशिवाय गट शेती, स्वयंसहायता बचत गटांच्या यशोगाथा, महिला बचत गटांनी उत्पादित केलेले कृषी उत्पादने, शेतकऱ्यांनी तयार केलेले नाविन्यपूर्ण शेती अवजारे इत्यादींची अभिनव दालने प्रदर्शनीचे आकर्षण केंद्र ठरणार आहे. या प्रदर्शनीमध्ये १००-१५० हून अधिक दालने राहणार असून हे कृषीप्रदर्शन राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंद पर्वणी ठरणार आहे. केवळ बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील शेतकरी बंधू-भगिनींना, युवक- युवतींना या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. भव्य दिव्य प्रांगणामध्ये या राज्यस्तरीय प्रदर्शनी, कृषी महोत्सव व चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी आधुनिक शेती व्यवसायातील विविध नावीन्यपूर्ण संधींचे प्रदर्शन या निमित्ताने शेतकरी बंधू-भगिनींना बघावयास मिळणार असून ड्रोन तंत्रज्ञानासह स्वयंचलित यंत्रे-अवजारे, पीक संरक्षणाच्या विविध पद्धती, औषधी व सुगंधी जाती,फळे – फुले, रानभाज्याचे प्रदर्शन लक्षवेधी ठरणार आहे. प्रदर्शनी ची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ०७ वाजेपर्यंत असून ही प्रदर्शनी जिल्ह्यासह राज्यात बंधू-भगिनी, युवक-युवतीना रोजगार स्वयंरोजगार व कौशल्याच्या नानाविध संधी प्रत्यक्ष अनुभवत आत्मसात करण्याची एक पर्वणीच ठरणार असल्याचे माजी आ.धोंडे यांनी सांगीतले.
आष्टीत होणा-या पहिल्याच कृषी प्रदर्शना मध्ये छञपती,शाहू,फुले,आंबेडकर कृषी महाविद्यालयातील उभारलेले उद्योग व त्यांचा अनुभव कथन करण्यासाठी उभारण्यात येणारी यशस्वी विद्यार्थी व्यावसायिकांची दालने या प्रदर्शनीचे आकर्षण ठरणार आहे. संस्थेचे अध्यक्ष भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून कृषी प्रदर्शन होत असलेले उज्वल भविष्यासाठी आदर्श ठरणार असून महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी उद्योग उभारून व इतर अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. कृषी पदवीधर व इतर विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून मार्गदर्शन तसेच माहिती जाणून घेण्याकरिता एक सुवर्णसंधी या निमित्ताने उपलब्ध होणार असल्यामुळे त्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहनही संयोजकांनी केले आहे.