spot_img
spot_img

आता आष्टीत बनणार डॉक्टर, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची सुवर्णसंधी,.आ. भीमरावजी धोंडे यांच्या शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संचलित महेश आयुर्वेद महाविद्यालयास अंतिम मान्यता

आष्टी (प्रतिनिधी):-जीवनातील अज्ञानाचा अंध:कार दूर करण्यासाठी ज्ञानाचे तेजवलय लेवून तरुणांनाही लाजवेल अशा अथक आणि अविरत परिश्रमातून शैक्षणिक कार्यात स्वत:ला झोकून देणारे,आमच्या ग्रामीण भागातील खेड्यातील पाड्यातील गोरगरीब मुलांनी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवला पाहिजे मुल घडले पाहिजेत यासाठी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून ज्ञानसंपन्न, चारित्र्यसंपन्न पिढी घडावी, यासाठी शिक्षणमहर्षी मा.आ.भिमरावजी धोंडे प्रयत्न करत आहेत.आष्टी पाटोदा शिरूर सह शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान आहे.आष्टी येथील मुलांना वैद्यकीय शिक्षणाची सुवर्ण संधी मा.आ.भिमरावजी धोंडे यांनी उपलब्ध करून दिली आहे. शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी ,संचलित महेश आयुर्वेद महाविद्यालयास शासनाची अंतिम मान्यता मिळाली असुन वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पहिल्या ६० विद्यार्थ्यांच्या प्रवेश तुकडीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.आता गोरगरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरांना आष्टीतच डाॅक्टर होता येणार आहे.हि सुवर्णसंधी आष्टी येथे मा.आ.भीमरावजी धोंडे साहेब यांनी उपलब्ध करून दिली आहे .

शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संचलित महेश आयुर्वेद महाविद्यालयाच्या अधिपत्याखाली रुग्णालय सुरू राहणार आहे.दुर्धर आजारांवर चांगली सेवा दिली जणार आहे.शहरासह परिसरातील रुग्णांवर येथे उपचार केले जाणार आहेत.महाविद्यालयाला संलग्न असलेल्या येथील डाॅक्टरांकडून उपचार दिले जाणार आहेत.रुग्णालय अपडेट आहे.नवीन अभ्यासक्रमांमुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना आणखी अद्ययावत जलद उपचार सेवा मिळणार आहे. विद्यार्थ्यांना येथील दाखल रुग्णावर उपचार करणे लक्ष ठेवणे बंधनकारक आहे. वेगवेगळ्या राज्यातील बीएएमएस विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा येथील रुग्णांच्या उपचार सेवेत होणार आहे.महाविद्यालयास एन सी आय एस एम नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन यांची मान्यता तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांचे संलग्निकरण प्राप्त झाले आहे आष्टी तालुक्यातील पहिले व एकमेव आयुर्वेद महाविद्यालयास आनंद शैक्षणिक संकुलात परवानगी मिळाली असून मुलांचे BAMS होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तरी सन 2023- 24 साठी प्रवेश सुरू झाले असुन कॉलेज चा चॉईस कोड –124 116 हा असुन ज्या विद्यार्थ्यांना बीएएमएस आयुर्वेद महाविद्यालयास प्रवेश घ्यावयाचा आहे अशा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कॉलेज ला भेट द्यावी किंवा पुढील नंबर वर संपर्क साधावा मोबाईल नंबर 81 49 29 51 56 , 94 22 35 22 61 , 94 23 47 13 95.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!