spot_img
spot_img

आ.सुरेश धस यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर १४०० कोटी रू.च्या ..शिंपोरा ते खुंटेफळ साठवण तलाव थेट जलवाहिनी कामाची बी-१ निविदा काढण्यास मान्यता ************************** उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ.सुरेश धस यांच्याकडे पत्र केले सुपूर्द

आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा मिळण्यासाठी खुंटेफळ साठवण तलाव हा अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्यातील महत्वाचा भाग असलेली उजनी जलाशय शिंपोरा ते थेट खुंटेफळ साठवण अशी जलवाहिनी (संरेखा) या १४०० कोटी रुपये किंमतीच्या कामाची बी-१ निविदा प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी देत असल्याचे पत्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री, देवेंद्रजी फडणवीस यांनी सोमवार दि.६ नोव्हेंबर २०२३ रोजी आपल्या हाती सुपूर्द केले आहे अशी माहिती आ.सुरेश धस यांनी दिली..
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, ०२ मार्च २०२३ पासून आपण महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाकडे खुंटेफळ साठवण तलावासाठी महत्त्वाची असलेली शिंपोरा ते खुंटेफळ साठवण तलाव या थेट जलवाहिनी चे कामास बी-१निविदा काढण्यासाठी वारंवार पाठपुरावा केलेला आहे.. या पाठपुराव्याला यश आले असून.. आज ०६ नोव्हेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी.. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत आष्टी उपसा सिंचन योजना क्र.३ टप्पा क्र.१ उजनी जलाशय (शिंपोरा ) ते खुंटेफळ साठवण तलाव या जलवाहिनीची (संरेखेची) बी-१ निविदा काढण्यास मान्यता देत असल्याचे .. कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छ.संभाजी नगर यांना क्र.निविदा – ०८२३/ प्र.क्र. ४४३/२०२३/ मोप्र-१ दि.०६/११/२०२३ या पत्रान्वये, द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावात समाविष्ट किंमतीच्या मर्यादेत उपसा सिंचन योजना क्र.३ साठी नव्याने मंजुरी दिलेल्या उजनी जलाशय ते थेट खुंटेफळ साठवण तलाव या जलवाहिनीच्या (संरेखेच्या) कामावर खर्च करावा..या आणि इतर अटींच्या अधीन राहून निविदा प्रक्रिया राबविण्याच्या कामास परवानगी देत असल्याचे महाराष्ट्र शासनाच्या जल संपदा विभागाने मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छ.संभाजीनगर यांना दिलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे.तसेच या पत्रामध्ये महामंडळाने शिफारस केल्याप्रमाणे शिंपोरा ते खुंटेफळ साठवण तलाव या कामाचे स्थापत्य यांत्रिकी आणि विद्युत कामाची एकत्रित निविदा कामाचे नियंत्रण करण्याचे दृष्टीने योग्य राहील असे निर्देश देऊन कामाचे सुयोग्य नियोजन करून अवर्षणग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टिकोनातून या महत्त्वपूर्ण कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यास परवानगी देत असल्याचे कळवले आहे. या कामाची लवकरच निविदा प्रसिद्ध होणार असल्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून आष्टी तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातील अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला हा प्रकल्प असून लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही आ.सुरेश धस यांनी सांगितले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!