कडा (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील देवळाली येथील मॉर्निंग ग्रुप ने वृक्षारोपण केलेले झाडे अतिशय चांगल्या प्रमाणात बहरली आहेत.वृक्षारोपण ही काळाची गरज आहे कारण वाढते औद्योगिकीकरण आणि जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे हवामानातील बदल तापमान वाढ ग्लोबल वार्मिंग सारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे हे पर्यावरणाचे संतुलन राखणे आणि हवा पाणी अन्न यासारख्या नैसर्गिक संसाधनासाठी आवश्यक आहे
वृक्षारोपण फार महत्वाचे आहे पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण केल्याने जंगल तोड मातीची धूप वाळवंटीकरण यासारख्या पर्यावरणीय समस्या कमी होतात हवामानातील बदल रोखण्यासाठी वाढत्या औद्योगिकीकरणामुळे होणारे तापमान वाढ ग्लोबल वार्मिंग चा सामना करण्यासाठी झाडे लावणे गरजेचे आहे झाडे मानव जातीसाठी निसर्गाची अनमोल भेट आहे ते आपल्याला श्वास घेण्यास ऑक्सिजन उन्हाळ्यात सावली प्रदान करतात वातावरण थंड ठेवतात झाडाचा प्रत्येक भाग कोणत्या न कोणत्या प्रकारे उपयुक्त असतो नैसर्गिक संसाधनासाठी हवा पाणी आणि सूर्यप्रकाश यासारख्या जीवनावश्यक गोष्टी मिळविण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखणे महत्त्वाचे आहे जे वृक्षारोपणाने शक्य आहे नैसर्गिक सौंदर्य आणि संतुलन वाढवण्यासाठी झाडे लावल्याने पर्यावरणातील सौंदर्य वाढते आणि निसर्गाचा नैसर्गिक समतोल राखला जातो प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करणे हे एक कर्तव्य आहे
वृक्षारोपण केल्यानंतर न चुकता नित्य नियमाने झाडांची काळजी घेणे पाणी देणे खत टाकणे शेळ्या इतर जनावरांपासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी जाळ्या लावणे ही कामे गेल्या पाच वर्षापासून मॉर्निंग ग्रुप करत आहेत त्यांनी आज पर्यंत असंख्य झाडे लावली आहेत