पाथर्डी (प्रतिनिधी): – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत पाथर्डी येथील श्री तिलोक जैन विद्यालयाचा विद्यार्थी चि. संयम अनिल खाटेर याने राहुरी येथे पार पडलेल्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत १७ वर्षांखालील गटात मोठे यश संपादन केले आहे. त्याच्या या उत्तम खेळीच्या जोरावर त्याची पुणे येथे होणाऱ्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
संयमच्या या यशाबद्दल श्री तिलोक जैन संस्थेचे सचिव, विश्वस्त पदाधिकारी, शाळेचे प्राचार्य, क्रीडा शिक्षक, तसेच आनंद चेस क्लब पाथर्डी, एस.के. चेस क्लासेसचे प्रशिक्षक व खेळाडू यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशामुळे पाथर्डी तालुक्यातील विद्यार्थी व पालक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.