spot_img
spot_img

कुसळंब येथे जि. प.सदस्य माऊली जरांगे यांचा वाढदिवस सोहळा जनसेवेला समर्पित ************************************ कार्यकर्त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा नेता म्हणजे आ.सुरेश धस – ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कोठुळे

आष्टी (प्रतिनिधी) पाटोदा तालुक्यातील कुसळंब गावात मराठवाड्याच्या जनतेच्या मनात घर केलेले, लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस यांचे निष्ठावंत शिलेदार व अंमळनेर सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य माऊली आप्पा जरांगे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन सामाजिक बांधिलकी जपत भव्यदिव्य पद्धतीने करण्यात आले.
हा सोहळा केवळ वाढदिवसाचा नव्हता, तर माणुसकी, संवेदनशीलता आणि समाजकारणाचा सण ठरला.
गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पुरपरिस्थितीमुळे शेतकरी बांधवांचे, तसेच गोरगरीब कुटुंबांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माऊली जरांगे यांनी एक आगळावेगळा निर्णय घेत, “हार-तुरे नकोत, एक हात मदतीचा” या उपक्रमाची संकल्पना मांडली.अभिष्टचिंतन सोहळ्यात शुभेच्छा देण्यासाठी फुलांचे हार, तुरे किंवा बुके देण्याऐवजी, तीच रक्कम अतिवृष्टीग्रस्त शेतकरी व कुटुंबांसाठी देणगी म्हणून स्वीकारण्यात आली.या उपक्रमातून समाजातील नागरिक, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि विविध संस्था यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि अखेर या सोहळ्यातून तब्बल २ लाख ८१ हजारांची देणगी गोळा झाली.
हा उपक्रम मराठवाडा भूषण लोकनेते आमदार सुरेश धस प्रतिष्ठान आणि माऊली जरांगे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला.सामाजिक जाणीवा आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा हा सुंदर संगम उपस्थित प्रत्येकाच्या मनाला भिडला.
ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कोठुळे यांनी आपल्या भाषणात अत्यंत भावनिक शब्दात माऊली जरांगे यांचा गौरव केला.यावेळी मनोगत व्यक्त ते म्हणाले,“कार्यकर्त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा नेता म्हणजे आमदार सुरेश धस.मी दोनदा भेटून समाजातील कार्याची विनंती केली होती, आणि त्यांनी ती विनंती मनापासून पूर्ण केली.
योग्य माणसाची योग्य माणसानेच किंमत केली पाहिजे. आमदार धस यांनी तीच केली आहे. त्यांनी समाजाला माऊली आप्पा जरांगे या रूपाने चंदनाची बाग दिली आहे. तिचा कोळसा करू नका. हा कार्यकर्ता म्हणजेच सेवाभावाचा सच्चा आरसा आहे.”
यावेळी गणेश शिंदे यांनी आपल्या मनोगतात म्हणाले,“आ. सुरेश धस यांचा कार्यकर्ता कसा असावा, याचं उत्तम उदाहरण म्हणजे माऊली जरांगे. त्यांच्यातील प्रामाणिकपणा, जिद्द, त्याग आणि समाजसेवेसाठी असलेले समर्पण अनुकरणीय आहे. मी आणि माऊली 2005 पासून सोबत काम करत आहोत. त्या काळात आमचे नाते फक्त मित्रत्वापर्यंत मर्यादित राहिले नाही, तर ते रक्तापेक्षा घट्ट बंधन बनले.
अभिष्टचिंतन सोहळ्यातून समाजासाठी देणगी देण्याचा त्यांचा निर्णय इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल.”आम्ही मराठवाडाभूषण लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस प्रतिष्ठानच्यावतीने गावोगावी आवाहन करून आपल्या भागात आलेल्या अतिवृष्टीग्रस्तांना एक हात मदतीचा आवाहन केले असून त्यातून प्रचंड प्रतिसाद पुढे येत आहे.माऊली जरांगे यांनी अभिष्टचिंतन सोहळ्यातुन हा उपक्रम चालवला त्यांचा इतरांनी देखील आदर्श घ्यावा.
यावेळी माऊली जरांगे उपस्थितीशी कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले,“मी सुरेश आण्णा यांच्या कार्यसंघात आहे, आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित आहे. आम्ही कार्यकर्ते आहोत, पदाची किंवा सत्तेची अपेक्षा नाही.
आमदार धस यांनी कार्यकर्त्यांना जे प्रेम, सन्मान आणि प्रोत्साहन दिलं, ते अन्यत्र दुर्मिळ आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना प्रत्येक कार्यकर्त्याला उर्जा मिळते.
मी वाढदिवस साजरा करायचा ठरवला, पण तो खर्च समाजासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. ही केवळ देणगी नव्हे, तर माणुसकीचा उत्सव आहे.पुढील काळात बेरोजगार तरुणांना दिशा देणे, व्यसनमुक्त समाज निर्माण करणे, आणि शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याचा माझा दृढ मानस आहे. माझ्या प्रत्येक कृतीत सुरेश आण्णा यांची प्रेरणा आणि विचार दिसतील.”
या प्रेरणादायी सोहळ्याला ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कोठुळे, ह.भ.प.कैलास महाराज पवार,नगराध्यक्ष जिया बेग,गणेश शिंदे,भाजपा तालुकाध्यक्ष भागवत येवले, सभापती किरण शिंदे, सभापती सतीश जाधव, राजेंद्र दहातोंडे, सरपंच पद्माकर घुमरे, अतुल मकाळ, शरद बामदळे, महादेव पवार, बाळासाहेब बोराडे, असिफ सौदागर, सुशील ढोले, गणेश गर्जे, अभयकुमार पवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण पोकळे, अशोक सुपेकर, पत्रकार पोपट कोल्हे,पत्रकार अविराज पवार,गोविंद गाडे, संजय खोटे, नारायण येवले, अंकुश लांबरूड, राजेंद्र दहातोंडे, सरपंच दत्तात्रय खोटे, पत्रकार समीर शेख, शाहू टेकाळे, वसंत बांदल आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
भाषणे अशोक जेधे, अतुल मकाळ, महादेव पवार, भाऊसाहेब ससे,विकास सानप आदी मान्यवरांनी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज गंडाळ आणि उपसरपंच दादा पवार यांनी अत्यंत सुरेखरीत्या पार पाडले.
कार्यक्रमाच्या यशासाठी माऊली जरांगे मित्र मंडळातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

*************************************
➡️ हार-तुरे नकोत;एक हात मदतीचा” या उपक्रमातून तब्बल २ लाख ८१ हजारांची देणगी जमा झाली.

हा सोहळा केवळ वाढदिवसापुरता मर्यादित न राहता “हार-तुरे नकोत, एक हात मदतीचा!” या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित समाजसेवेचा महोत्सव ठरला.गेल्या काही दिवसांपासूनच्या अतिवृष्टीमुळे आणि पूरस्थितीमुळे शेतकरी बांधव, मजूर वर्ग आणि गोरगरीब कुटुंबे मोठ्या अडचणीत सापडली आहेत. या पार्श्वभूमीवर जि. प.सदस्य माऊली जरांगे यांनी आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात वाढीव खर्च टाळून समाजोपयोगी सामाजिक भान ठेवून कार्यासाठी देणगी देण्याचे आवाहन केले.
त्यास लोकनेते आ. सुरेश धस प्रतिष्ठान आणि माऊली जरांगे मित्र परिवार यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सोहळ्यात शुभेच्छा देण्यासाठी हार, तुरे किंवा फुलांचे बुके न देता, उपस्थितांनी तीच रक्कम “अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आणि गरीब बांधवांसाठी” देणगी म्हणून दिली.
या उपक्रमातून एकूण ₹२ लाख ८१ हजारांची देणगी जमा झाली.

➡️मराठवाडाभूषण लोकनेते सुरेश धस प्रतिष्ठानचा पुढाकार
************************************
या उपक्रमाचे आयोजन मराठवाडा भूषण लोकनेते आ. सुरेश धस प्रतिष्ठान आणि माऊली जरांगे मित्र मंडळ यांच्या माध्यमातून करण्यात आले.
“एक हात मदतीचा” या संकल्पनेला आष्टी मतदारसंघातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमातून जमा झालेल्या निधीचा उपयोग पुरग्रस्त शेतकरी, मजूर वर्ग आणि अडचणीत सापडलेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी आ.सुरेश धस यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधी दिला जाणार आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!