कडा (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील देवळाली येथे सालाबाद प्रमाणे मेंढवाडी देवीची यात्रा सोमवार दि.०६/१०/२०२५ रोजी होणार आहे.
महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक यात्रा उत्सवाला हजेरी लावतात या यात्रा उत्सवात देवी भक्तांची प्रचंड गर्दी उसळते नाचणारे पोतराज आणि मळवट भरलेल्या महिला भक्तांनी मंदिर परिसर फुलून गेलेला असतो यात्रेमध्ये विविध प्रकारचे खेळणी चे दुकाने खाऊचे दुकाने तसेच राहाट पाळणे अशा अनेक प्रकारचे दुकाने यात्रेमध्ये येतात कोजागिरीला पैठण नागतळा येथून आणलेल्या गंगेच्या पाण्याने अभिषेक केला जातो देवीला केलेला नवस फेडण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भावीक भक्त हजेरी लावतात
पैठण व नागतळा येथून आणलेल्या कावडीचे मोठ्या उत्साहात गावातून मिरवणूक काढून मेंढवाडी देवी मंदिराला पाच प्रदक्षिणा घालून आणलेल्या पाण्याचा जलाभिषेक केला जातो मेंढवाडी देवी यात्रा उत्सवात हजारो भाविक सहभागी होऊन देवीचे दर्शन घेतात मेंढवाडी देवीचे मंदिर हे देवळाली गावाच्या आग्नेय दिशेस असलेल्या डोंगरावर आहे श्री जगदंबा मातेचे मंदिर हे खूप विलोभनीय असून तुळजापूर देवीचे एक शक्तिपीठ आहे भक्ताचे नवसाला पावणारी आणि इच्छापूर्ती करणारी श्री जगदंबा माता एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते मंदिराच्या गाभाऱ्यात देवीच्या दोन सुंदर मूर्ती असून एक तुळजापूरची देवी तर दुसरी मेंढवाडी देवी असे एकत्र असलेले देवीचे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे मंदिरांचे भव्य दिव्य बांधकाम हे लोकवर्गणीतून करण्यात आले आहे मंदिर परिसरामध्ये एक मोठी उंच अशी दीपमाळ आहे व यज्ञकुंड आहे हा उत्सव घटस्थापने पासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालतो यात्रेनंतर या सर्व कार्यक्रमाची सांगता होते