आष्टी (प्रतिनिधी)राज्यभरात सध्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत या बदलीमुळे अनेक वर्ष विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षकांना शाळा सोडून दुसऱ्या ठिकाणी शिकवण्यासाठी जावे लागत आहे अशीच बदली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवाचा मळा देवळाली ता.आष्टी येथील श्री आजिनाथ तांदळे सर या शिक्षकाची शासन नियमाप्रमाणे झाली आहे त्यानिमित्ताने शाळेत निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सोन्याच्या चांदीच्या कोंदनात प्रकाशतात हिरे प्रमुख पाहुणे म्हणून शोभतात आपणच शिक्षणप्रेमी खरे अशा बहारदार कवितेने बारवकर सर यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली.आदिनाथ सर यांनी सलग वीस वर्षे सेवा करत असताना प्रत्येक कार्यक्रमातून गावकऱ्यांना प्रोत्साहित केले शाळेचे गुणवत्ता टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला या कार्याचे गावकऱ्यांनी कौतुक केले याप्रसंगी सर्वांचे डोळे भरून आले. निरोप समारंभात या सुरुवातीला आजिनाथ तांदळे सर यांचे स्वागत केले देवळाली गावचे सरपंच श्री पोपट शेकडे यांनी आजिनाथ तांदळे सर यांचा सत्कार करून सन्मान केला या निरोप समारंभ प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना. देवळाली चे सरपंच श्री पोपट शेकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की, आजिनाथ सर हे एक उत्तम शिक्षक होते त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये खूप विद्यार्थी घडवले. त्यांच्या मागणीनुसारच शाळेसमोरील पटांगणात ब्लॉक किचन शेडचे काम पाण्याचा बोर ही कार्य करू शकलो तसेच अजूनही शाळेसाठी कामे करायची आहे जसे की शाळेची संरक्षक भिंत, पाण्यासाठी हौद,शौचालय व नागरे वस्तीवरून विद्यार्थ्यांना येण्यासाठी पूल अशी कामे मी लवकरच मार्गी लावणार आहे असे आश्वासन शेकडे सरपंच यांनी दिले आजिनाथ सर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या फुंदे सर म्हणाले की,या ठिकाणी पूर्वी खूप छोटी शाळा होती पण आजिनाथ सर यांनी छोट्याशा रोपट्याचे वटवृक्ष केला आहे मी या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम चांगल्या प्रकारे करणार आहे आणि त्याबरोबर विद्यार्थ्यांबरोबर बालकांची ही साथ मला हवी आहे अंगणवाडी सेविका सुरेखा तांदळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना एक छानशी कविता सादर केली आजचा क्षण आनंदाचा आहे पण डोळ्यात पाणी आहे तुमची मेहनत आणि हसतमुख स्वभाव आणि मदतीची भावना कायम प्रेरणा देईल तुमच्या सोबतच्या आठवणी कायम कोरल्या जातील तुमचा पुढचा प्रवास आनंदाचा यशाने भरलेला असो ही शुभेच्छा तुमचे योगदान अनमोल आहे तुमची आठवण येत राहील तसेच भरत तांदळे बाळासाहेब तांदळे, पत्रकार अतुल जवणे, अंगणवाडी सेविका राजगुरू मॅडम आणि विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले बारवकर सर यांनी आपल्या काव्यरचनेतून बहारदार सूत्रसंचालन केले आणि आजिनाथ सर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व नवीन रूजू झालेल्या फुंदे सरांचे स्वागतही पोपट शेकडे सरपंचा सह पालकांनी केले.या कार्यक्रमास पोपट शेकडे सरपंच अतुल जवणे पत्रकार भरत तांदळे,बाळासाहेब नागरे, बाळासाहेब तांदळे, संभाजी नागरे, बाबासाहेब नवले, शिवाजी तांदळे, विकास नागरे, देवीदास राजगुरू, मारुती तांदळे, ज्ञानेश्वर तांदळे, रावसाहेब तांदळे,ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय नवले, विठ्ठल तांदळे,राजु तांदळे रावसाहेब फुंदे सर, आदिनाथ तांदळे सर, आत्माराम बारवकर सर, सतिश तांदळे सर अंगणवाडी सेविका सुरेखा तांदळे मॅडम,मदतनीस राजगुरू मॅडम आदि उपस्थित होते