कडा (प्रतिनिधी)आष्टी तालुक्यात सर्व दूर झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना आलेल्या महापुरामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे देवळाली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि कन्या शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये तसेच कार्यालयांमध्ये तीन ते चार फुट पुराचे पाणी शिरले यामुळे कार्यालयातील महत्त्वाची दस्तावेज वर्ग खोलीतील संगणक फर्निचरचे प्रचंड नुकसान झाले आहे नदीला आलेल्या पुराचे पाणी गावात शिरून जिल्हा परिषद शाळेचे संरक्षण भिंत तसेच शौचालय पडल्यामुळे शाळेच्या प्रांगणात व वर्ग खोल्यांमध्ये पाण्यासह गाळ साचला. यामुळे शालेय दस्तऐवज फर्निचर संगणक खराब झाले विद्यार्थ्यांच्या उपयुक्त शैक्षणिक साहित्याचे देखील खूप नुकसान झाले पुराच्या पाण्याने शाळेची झालेली दयनीय अवस्था पाहून मुलं अक्षरशः रडायला लागली. मुलांची केविलवाणी अवस्था पाहून पालकांना गहिवरून आले शाळेचे शिक्षक शाळा साफसफाई करताना पाहून पालकांसह तरुण मदतीला सरसावले सर्वत्र चिखलच साचला होता जिल्हा परिषद शाळेची ही दयनीय अवस्था पाहून देवळाली गावातील तरुण मदतीसाठी पुढे आले. सर्व वर्ग खोल्या चिखलमय झाल्या होत्या गावातील तरुणांनी वर्ग खोल्या स्वच्छ धुऊन काढल्या यात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश खाडे, देविदास टकले सह संतोष ( बंडु) तळेकर,शरद खाडे,भगवान जवणे ,अविनाश नागरे,जालिंदर तांदळे,निलेश पवार सलीम शेख, दत्तू आमले,चैतन्य आमले,दादा कावेदार,अक्षय गायकवाड,पप्पू नागरे,बंडू टकले,रवि कुलकर्णी, राहुल पाठक,गणेश दत्तात्रय खाडे हे वर्ग खोल्या स्वच्छतेमध्ये सहभागी झाले होते . श्री कोहक सर ,आव्हाड सर वायभासे सर शिरसाट सर यांनी सर्वांचे आभार मानले