spot_img
spot_img

GSTदर बदलले आता काय होणार महाग ? काय होणार स्वस्त?

मुंबई (प्रतिनिधी)22 सप्टेंबरपासून नेमकं काय स्वस्त होणार? जीएसटीच्या नव्या रचनेचा आपल्याला कसा फायदा होणार
जीएसटी परिषदेची ५६ वी बैठक बुधवारी दिल्लीत सुरु झाली. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटीचे आता फक्त दोन स्लॅब असतील. 5% जीएसटी आणि 18%जीएसटी. 12%आणि 28% जीएसटीचा स्लॅब सरकारने संपुष्टात आणला आहे. 22 सप्टेंबरपासून नेमकं काय स्वस्त होणार आपण जाणून घेऊ
आरोग्य सेवा क्षेत्राला दिलासा आयुष्य वाचवणाऱ्या औषधांवरचा जीएसटी हटवला
सर्व प्रकारच्या लाइफ इन्शुरन्स आणि आणि वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीजवरून जीएसटी हटवला
थर्मामीटरवर जीएसटी 18% वरून पाच 5% वर
वैयक्तिक ऑक्सिजन तपासणीच्या किटस चष्म्यावरचा जीएसटी १२%वरून 5%वर
कृषी क्षेत्रालाही प्रोत्साहन
ट्रॅक्टर्स काही ठराविक कीटकनाशके ठिबक सिंचनासाठी लागणारे भाग आणि स्प्रिंगलर्स शेतात लागणारे इतर साहित्य यांचे 12% हून 5%
वर ट्रॅक्टरचे टायर आणि पार्टस जीएसटी 18% होऊन 5%
दैनंदिन वापरातील या वस्तू स्वस्त होणार
हेअर ऑइल हेअर ऑइल शाम्पू टूथपेस्ट ब्रश साबण सेविंग क्रीम यांचा जीएसटी 18% वरून 5%
दूध पनीर ब्रेड वरचा जीएसटी हटवला
बटर तूप चा चीज डेअरी स्प्रेड भांडी बाळांचे डायपर्स शिलाई मशीन आणि त्यांचे भाग यांचा जीएसटी 12% वरून 5% वर
आणखी काय स्वस्त होणार
सिमेंट हॅन्डीक्राफ्ट चामड्याच्या वस्तू यांचा जीएसटी 28 % वरुन 18 % झाला
कचरा व्यवस्थापन सेवा 18 % हून 5%

काही घरगुती उपकरणे स्वस्त
एअरकडीशनर 32इंचापेक्षा मोठे TV मॉनिटर आणि प्रोजेक्टर डिश वॉशिंग मशीन GST 28%वरुन18% वर
शालेय सामान स्वस्त
नकाशे आणि चार्टस पेन्सिल क्रेऑन्स शार्पनर आणि लिहायच्या वह्यावरचा जी एस टी हटवला
खोडरबरवर 18%हून 5%
मिडल क्लासच्या गाड्या स्वस्त
पेट्रोल LPG CNG आणि हायब्रीड गाड्या 1200cc आणि 4000mmलाबींपर्यत जी एस टी 28% हून 18%
डिझेल गाड्या 1500ccआणि 4000mmलाबींपर्यन्त 28%वरून 18%वर
तीन चाकी वाहने 350ccपर्यन्तची बाईक छोटी मालवाहु वाहनं GST 28%वरून18%वर आला
तर मग महागलं काय
लक्झरी आणि चैनीच्या सामानावर आता 40%GST
तंबाखू गुटखा सिगारेट पानमसाला आणि इतर संबंधित उत्पादनं
साखर युक्त ड्रीक्स लक्झरी वाहनं 1500ccपेक्षा मोठ्या इंजिन च्या डिझेल आणि 1200ccपेक्षा मोठ्या इंजिनच्या पेट्रोल गाड्या यांच्यावरचा GST 40%

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!