spot_img
spot_img

अनुस्पर्श फाउंडेशन मार्फत भव्य रक्तदान, नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन

पाथर्डी (प्रतिनिधी)– तालुक्यातील जाटदेवळे येथे ह.भ.प. गुरुवर्य मुकुंद काका जाटदेवळेकर यांच्या कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने अनुस्पर्श फाउंडेशन यांच्या पुढाकाराने जाटदेवळे येथे शनिवार १६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या वेळेत भव्य रक्तदान, नेत्र तपासणी व सर्वसामान्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत नेत्र तपासणी, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्त्रीरोग तपासणी, दंत तपासणी अशा विविध आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत. तसेच, रक्तदान शिबिरामध्ये जमा होणारे रक्त गरजू रुग्णांसाठी रक्तपेढीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहे.
आरोग्यजागरूकता वाढविणे व “रक्तदान हेच जीवनदान” हा सामाजिक संदेश पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सेवाकार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन अनुस्पर्श फाउंडेशनचे सचिव डॉ. उध्दव घोशीर यांनी केले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!