अहिल्यानगर (प्रतिनिधी) : शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने दुसरे राज्यस्तरीय मध्यवर्ती साहित्य संवाद कार्यक्रम व काव्य संमेलन आळंदी येथे रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी राजेंद्र चोभे यांच्या अध्यक्षतेखाली होत असून या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक फकीरा पवार पुणे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे” अशी माहिती संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली.
शब्दगंध साहित्यिक परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक कोहिनूर मंगल कार्यालयात अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.त्यावेळी कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली.सकाळी 11 वाजता राजेंद्र चोभे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला सुरुवात होणार असून यावेळी अभियंता मित्र चे संपादक कमलकांत वडेलकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.संदीप सांगळे,आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त किसनराव घुले व तुळापूर येथील नवनाथ शिवले पाटील इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ह.भ.प.गोरक्षनाथ महाराज उदागे हे “संत साहित्याची सामाजिक उपयोगीता” या विषयावर परिसंवादामध्ये बोलणार आहेत.त्यानंतर सामाजिक कार्य गौरव पुरस्कार शिरीष थोरवे,उद्योजकता गौरव पुरस्कार नानासाहेब शेळके तर साहित्यिक कार्य गौरव पुरस्कार प्रा.विठ्ठल बरसमवाड व मारुती खडके यांना प्रदान करण्यात येणार आहेत.स्नेहभोजनानंतर दुपारी दोन वाजता बाळासाहेब देशमुख यांचे कथाकथन होणार आहे.त्यानंतर निमंत्रित कवींचे कवी संमेलन होणार आहे.यामध्ये रामदास कोतकर,लक्ष्मीकांत तरोटे,डॉ.अमोल आगाशे,दिलीप कापसे,विठ्ठल सोनवणे,सरला सातपुते,सुमेध ब्राह्मणे,बाळासाहेब गिरी,स्वाती पाटील,स्नेहा पाठक, स्वाती राजेभोसले,सुयश वाघमारे,सुरेखा घोलप,डॉ.विनायक पिंपळकर,गोकुळ गायकवाड,स्वाती काळे,दुर्गा कवडे,रूपचंद शिदोरे,डॉ.प्रभा अंभोरे, वृषाली आठवले,प्रबोधिनी पठाडे,सुजाता पुरी,साहेबराव तुपे,रुक्मिणी नन्नवरे,प्रवीण मोरे, समृद्धी सुर्वे,स्वाती अहिरे,शहाराम आगळे,राहुल शिंदे,अनुराधा आहेर यांच्यासह अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कवी सहभागी होणार आहेत.
दुपारी साडेतीन वाजता या कार्यक्रमाचा समारोप होणार असून यावेळी कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे,डॉ.जी.पी.ढाकणे,बापूसाहेब भोसले,एड.अमोल जाधव, चंद्रमणी इंदुलकर,हरिभाऊ गोसावी,डॉ.अशोक दौंड,डॉ.किशोर धनवटे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष राजेंद्र उदागे,सचिव सुनील गोसावी,भगवान राऊत,भारत गाडेकर,डॉ.अशोक कानडे,डॉ. तुकाराम गोंदकर,स्वाती ठुबे,डॉ.अनिल गर्जे,राजेंद्र फंड,बबनराव गिरी,राजेंद्र पवार, शर्मिला गोसावी,प्रशांत सूर्यवंशी,मकरंद घोडके प्रयत्नशील आहेत.