आष्टी (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने “आपली आष्टी, हरित आष्टी” या संकल्पनेतून वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ आज आष्टी शहरातील गवारे वस्ती रोड, उपबाजार समिती परिसर आणि घनकचरा व्यवस्थापन केंद्र परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमाचा शुभारंभ आमदार मा. श्री. सुरेश धस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमात आमदार सुरेश धस यांनी स्वतः झाडे लावून मोहिमेत सहभाग नोंदवला. याप्रसंगी सुरेश धस म्हणाले , “प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”
या उपक्रमात धनश्री बिगर शेती नागरी पतसंस्था मर्या. आष्टी, श्री गणेश विद्यालय आष्टी, जिल्हा परिषद कन्या प्रशाला आष्टी आणि टायगर अकॅडमी आष्टी या संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आमदार सुरेश धस यांनी त्यांचे विशेष आभार मानले आणि कौतुक केले.
या कार्यक्रमास आष्टी तहसीलदार वैशाली पाटील, नायब तहसीलदार तथा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बाळदत्त मोरे, आष्टी नगराध्यक्ष जिया बेग,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, पाटोदा भाजपा तालुकाध्यक्ष भागवत येवले शिरूर कासार भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश उगलमुगले उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,नगरसेवक अरुण भैय्या निकाळजे,
गटनेते तथा नगरसेवक किशोर झरेकर,नगरसेवक भारत मुरकुटे, नगरसेवक शरीफ शेख, नगरसेवक सुरेश वारंगुळे, नगरसेवक इर्शान खान, नगरसेवक सुनील रेडेकर, नगरसेवक बाळासाहेब घोडके, बाबू कदम, संजय मुळे,शाम वाल्हेकर, इंजि.गहीनाथ शिरसाठ,इंजि.अथहर बेग,लेखपाल साठे यांच्यासह शासकीय अधिकारी-कर्मचारी, पर्यावरणप्रेमी नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.