मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या २१ महिन्यांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या स्व. महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणी अखेर विशेष तपास यंत्रणा एसआयटीची स्थापना करण्यात आली असून त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत आमदार सुरेश धस यांनी या हत्याप्रकरणी बसत्यात बांधलेला तपास करायला भाग पडल्याने अखेर विशेष तपस यंत्रणा स्थापन करण्यात आले असून यांच्या वतीने पुढील तपास करण्यात येणार आहे त्यामुळे स्वर्गीय महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या प्रकरणात सातत्याने आवाज उठवत, न्यायासाठी लढा देणारे आमदार सुरेश धस यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मुळेच आज मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक (S.I.T.) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
आ. सुरेश धस यांनी आज मुंबईत स्व. महादेव मुंडे यांची पत्नी सौ. ज्ञानेश्वरी मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांना सोबत घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत आमदार धस यांनी संपूर्ण प्रकरणाचे गंभीर तपशील, खरे आरोपी कोण आहेत तसेच आरोपींना मदत करणारे पोलीस अधिकारी कोण आहेत याची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांसमोर ठामपणे मांडली.
मुख्यमंत्री मा. श्री. फडणवीस साहेबांनी या प्रकरणाची भावनिक व गांभीर्याने दखल घेत त्वरित पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) यांना S.I.T. स्थापन करण्याचे स्पष्ट आदेश दिले.
या निर्णयामुळे मुंडे कुटुंबीयांना मोठा मानसिक आधार मिळाला असून, सत्य बाहेर येईल आणि गुन्हेगार कायद्याच्या तावडीत सापडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
“स्व. महादेव मुंडेंना न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही,” असा ठाम निर्धार आमदार सुरेश धस यांनी या प्रसंगी पुन्हा एकदा व्यक्त केला.