आष्टी (प्रतिनिधी) गेली ७५ वर्षापासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाकिस्तान भारताच्या कुरापती काढत आला आहे..घुसखोरी करून आलेल्या दहशतवाद्यांना प्रत्येक वेळी त्यांना भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देऊन.. अगोदर केवळ निषेध व्हायचा परंतु आता पाकिस्तानात घुसून मारण्यात येत आहे..
आज संपूर्ण देश सुरक्षित आणि बिनधास्त राहात आहोत ते फक्त भारतीय जवानांमुळेच.. त्यामुळेच जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यत पाकिस्तान भारताचा मारच खाणार आहे पाकिस्तानने कधीही भारताच्या नादी लागू नये असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले..
कारगील विजय दिनाच्या औचित्याने आष्टी शहरात सैनिक सेवा संघ मुख्यालय बीड जिल्हा व त्रिदल संघटनेच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झाला यावेळी प्रमुख मार्गदर्शक करताना आ. सुरेश धस बोलत होते.
यावेळी कारगील युद्धात शहीद झालेले पाटोदा तालुक्याचे सुपुत्र शहीद सुभाष सानप यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी
व्यासपीठावर अभिनेते तथा व्याख्याते विक्रम जगताप,अभय धोंडे,तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, त्रिद्ल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अंकुश खोटे,अशोक भोसले,सुनील रेडेकर यांचेसह सह त्रिदल संघटनेचे पदाधिकारी,व्यापारी, पत्रकार ,विद्यार्थी,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले , ” 3 मे 1999 रोजी सुरू झालेल्या या युद्धात भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन विजय’ अंतर्गत 85 दिवसांच्या संघर्षानंतर 26 जुलै 1999 रोजी टायगर हिलवर तिरंगा फडकवून विजय प्राप्त केला. या लढ्यात 527 भारतीय जवानांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. यामध्ये कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टनंट संदीप उन्नीकृष्णन, ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव यांसारख्या वीरांनी अतुलनीय शौर्य गाजवले.याच युद्धात पाटोदा तालुक्यातील शहीद सुभाष सानप यांनी देशासाठी प्राणार्पण केले. त्यांचे बलिदान संपूर्ण बीड जिल्ह्यासाठी गौरवाची आठवण आहे.भारतीय जवान देशाच्या सीमारेषांवर रात्रंदिवस सज्ज असून त्यांच्या त्यागामुळेच देशात शांतता आणि विकास नांदतो, हे विसरता कामा नये.”
शहीद सुभाष सानप यांच्या बलिदानाचा गौरव करताना उपस्थितांनी अश्रुपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी आजी माजी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अंकुश खोटे बोलताना म्हणाले की,
तब्बल ६६ दिवस भारत मातेच्या शुर वीरांनी रात्र दिवस झुंज देऊन आपल्याला कारगील विजय मिळून दिला.२६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस म्ह्णून आज आपण साजरा करत आहोत. आजच्या तरुणांईला यावेळीच्या पराक्रमाची जाणीव होण्यासाठीचा हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी अभिनेते तथा व्याख्याते विक्रम जगताप म्हणाले,
सैनिकांचे पराक्रम आणि त्याग आपले लोक लगेच विसरून जातात.सैनिक आणि त्यांचा त्याग या गोष्टीचे महत्व आपल्या लोकांना जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जाणीव होणार नाही. आपल्या सीमेवर काम करणाऱ्या प्रत्येक सैनिकाला आपल्या कर्तृत्वाची जाणीव असल्याने तो आपलं कर्तव्य बजावत आहे तो पैशासाठी काम करत नाही. तो देश सेवा करण्याचं ध्येय ठेवूनच आपले कर्तव्य सीमेवर करत असतो असे सांगत त्यांनी आपल्या व्याख्यानातून कारगील युद्धाचा थरार आपल्या शब्दात उपस्थितांना सांगितला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर गळगटे यांनी केले.
यावेळी संघटनेचे संघटनेचे अध्यक्ष अंकुश खोटे, जमीर पठाण, संजीव फसले, नवनाथ भगत ,श्रीराम माने, हनुमान झगडे, बबन दहिफळे,गोरख काळे,मनीष नरोडे, विष्णू पवार,दिलीप मराठे ,दादासाहेब ठोंबरे, संजय गायकवाड आदींनी हा कार्यक्रम घेण्यासाठी परिश्रम घेतले.