spot_img
spot_img

आष्टी तालुक्यातील कृषी दुकाने राहणार तीन दिवस बंद

पिंपरी घाटा(प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाच्या नवीन प्रस्तावित कृषी कायदा विधेयक क्रमांक 40,41,42,43, व 44 मधील कृषी विक्रेत्यांना बाधा आणणाऱ्या जाचक नियमांना विरोध करण्यासाठी व प्रस्तावित कायदे रद्द करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कृषी सेवा केंद्र ऐन रब्बी हंगामात येत्या दोन ते चार नोव्हेंबर असा तीन दिवसाचा बंद पाळून राज्य शासनाच्या कायद्याचा निषेध नोंदवणार आहेत. या संदर्भात आष्टी तालुका कृषी निविष्ठा विक्री संघटना आष्टी, यांनी दिनांक 30 ऑक्टोबर रोजी तालुका कृषी अधिकारी आष्टी, तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती आष्टी, तहसीलदार आष्टी, तसेच मा. आ. सुरेश धस, व मा. आ. बाळासाहेब आजबे यांना निवेदन दिले आहे.
याबाबत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून, महाराष्ट्रभर तसेच प्रत्येक जिल्हे, तालुक्यामधील सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी दुकानासमोर बॅनर लावून व्हॉटसप स्टेटस ठेवून, व्हाट्सअप ग्रुप वर बंदचे माहिती देऊन, यासंदर्भात पुढील तीन ते चार दिवसात शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे खते, औषधे, व बियाणे जे लागणार आहेत ते शेतकऱ्यांनी अगोदरच घेऊन ठेवावेत, म्हणजे शेतकर्यांची गैरसोय होणार नाही, असे आवाहन कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र फर्टीलायझर्स डीलर्स असोसिएशन (माफदा ) यांनी वेळोवेळी माननीय कृषी सचिव कृषी आयुक्त तसेच सन्माननीय कृषिमंत्री मा. धनंजय मुंडे यांनाही निवेदन व मीटिंग घेऊन सदर अन्यायकारक कायद्यातील जाचक नियमामुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे होणारे संभाव्य नुकसान, व धोके संपूर्ण व्यापारावर होणारे विपरीत परिणाम, व त्यातून एकंदरीत शेतकरी बांधवांचे होणारे नुकसान याविषयी माहिती दिली गेली. यावर समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे सदर तीन दिवसाच्या बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी आष्टी तालुका कृषी असोसिएशनचे , अशोक तळेकर, अनिल मेहेर, गोरख कर्डीले, संपत शेळके, बबन राऊत, अमोल झगडे, रमेश कटके, संपत भोसले, शरद मुटकूळे इ उपस्थीत होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!