आष्टी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पांढरी शिवारातील आंधळेवाडी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणाचा भव्य उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम आष्टी-पाटोदा-शिरूर कासार विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सुरेश धस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
पांढरी ते आंधळेवाडी आणि आष्टी शहरातील बाजार समितीच्या परिसरात आणि शेकापूर रोड परिसरात
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लावण्यात आलेली ही झाडं भविष्यात गावात हरित पट्टा निर्माण करून सौंदर्यात भर घालणार असून पर्यावरणाच्या दृष्टीनेही अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. सामाजिक भान ठेवत पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश देणारा हा उपक्रम परिसरात कौतुकास पात्र ठरला आहे.
यावेळी आष्टी येथे माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे गटनेते किशोर झरेकर,सभापती सुरेश वारंगुळे, सभापती शरीफ शेख,नगरसेवक बाळासाहेब घोडके, दीपक निकाळजे,समीर बेग,सादिक कुरेशी, भाऊसाहेब निंबाळकर, बबलू शेख, शहादेव नरोडे, आत्माराम फुंदे, सुरज रोकडे, बंटी धोंडे, पत्रकार शरद रेडेकर, सलीम कुरेशी,पांढरी येथे सरपंच सुधीर पठाडे माजी सरपंच प्रकाश वांढरे, जालिंदर वांढरे,बंडू देशमुख, गणेश शेळके उपसरपंच गोवर्धन शेंबडे, अंबादास भोगाडे,वाल्मीक वांढरे,दादा वांढरे,धोंडीबा बापू वांढरे,प्रकाश हंबर्डे,अमृत वांढरे,रमेश वांढरे,दादा शेळके,अंगद पेचे,नामदेव वांढरे,राम वांढरे तसेच या उपक्रमात आष्टी आणि पांढरी गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.