आष्टी(प्रतिनिधी) आष्टी येथील”जगताप बेकर्स, काॅफी अँड डेअरी फार्मच्या वतीने गणेश गड नागतळा ते पंढरपूर पायी दिंडी जाणाऱ्या वारकऱ्यांना थंड पेय व केळी वाटप करण्याची सेवा केली आहे.याप्रसगी ह.भ.प. महंत काशिनाथ महाराज यांचे संचालक शुभम जगताप,शिवराज कोकणे व पत्रकार अविनाश कदम,अक्षय भोसले यांनी स्वागत केले.
ही पायी दिंडी (वारी) भक्त पालखी, कीर्तन मंडळी आणि हजारो वारकऱ्यांच्या समूहासह नागतळा ते पंढरपूर (विठ्ठल मंदिर) या मार्गाने जाते. या प्रवासादरम्यान वारकऱ्यांना अन्न-पाणी, छाया, आरामाची सोय, औषधी सेवा इत्यादी देण्यासाठी अनेक संस्था, व्यावसायिक आणि भक्त सेवेचा हेतूने मदत करतात. या अनुषंगाने आष्टीतील जगताप बेकर्स, काॅफी अँड डेअरी फार्मच्या वतीने धार्मिक यात्रेला सामाजिक जबाबदारी म्हणून पाठिंबा देत आहे. त्यांच्या वतीने केले जाणारे वाटप थंड पेय व केळी हे भक्तांना ऊर्जा आणि उत्साह देण्यासाठी असते. धार्मिक समुदायाला सहाय्य करणे आणि सामाजिक सेवेची संस्कृती जिवंत ठेवणे गरजेचे आहे. यावेळी एन टी गर्जे, सर्जेराव तांबडे, विश्वनाथ गर्जे, रंगनाथ सानप, बाळू पालवे, ज्ञानदेव गर्जे, शेषेराव गर्जे,ननवरे सर, कृष्णा मिसाळ, शिवाजी शेकडे, उमेश तांदळे, प्रसाद खंडागळे, विनायक साबळे, ओमकार कोकणे, गणेश वाल्हेकर आदी उपस्थित होते.