आष्टी (प्रतिनिधी) आई -वडीलांच्या रुणातुन कधीच कोणीलाच मुक्त होत येत नसते.प्रत्येक धर्म ग्रंथ, पुराण,शास्त्रात आई वडीलांचे महत्व,त्यांचे उपकारच सांगितले आहेत.श्रध्देने केलेले कार्य हे अजरामर राहत असते. कवी,लेखक गायकांनी आईचे वर्णन केलेले आहे मात्र जगतगुरु संत तुकाराम महाराज यांनी ख-या अर्थाने बापाचे वर्णन आपल्या अभंगातुन केलेले आहे.संगोपन (सांभाळणे), संवर्धन (वाढविणे) आणि संक्रमण (संस्कार पुढे देणे) असे काम माणुस करीत असतो.मरण कुणालाच चुकविता येत नसते.मरणाचे स्मरण व देवाचे स्मरण असले की जीवन सुखकर होते.तात्यासाहेब यांनी आपल्या तत्वांशी कधीच तडजोड केली नाही.एक आदर्श जीवन ते जगले.स्वातंत्र्य सेनानी काॕ.तात्यासाहेब पोकळे हे राजकीय,शैक्षणिक,सामाजिक, धार्मिक क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या निष्ठेला तोड नव्हती. स्वातंत्र्य सेनानी काॕ. तात्यासाहेब पोकळे तत्व व निष्ठावान नेते होते असे प्रतिपादन ह.भ.प.आदिनाथ महाराज दानवे यांनी केले.
आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील भाजपा माजी तालुकाध्यक्ष कल्याण पोकळे यांचे वडील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक काॕ.तात्यासाहेब पोकळे यांच्या दशक्रियाविधीनिमित्त आयोजित शोकसभेत ते प्रवचन सेवेत बोलत होते.
यावेळी भाजपाचे आ.सुरेश धस म्हणाले की,तात्यासाहेब पोकळे यांनी आयुष्यभर डाव्या विचार सरणीची कास धरून अपुर्ण साधनांसह आपल्या कष्टाने आणि मेहनतीने कम्युनिस्ट विचार तळागाळात पोहोचविला. अन्यायाविरोधात अनेक मोर्चे,आंदोलने उभारत त्यांना न्यायाची भूमिका मांडली.प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली.गावचे उपसरपंच ते पंचायत समिती सदस्य या पदांवर त्यांनी लोकांसाठी कार्य केले.त्यांच्या कार्याची परंपरा त्यांचे सुपुत्र कल्याण पोकळे यांनीही लहानपणापासूनच संघटनात्मक कामात सक्रिय राहून पुढे चालवली.वडिलांची सेवा करत त्यांनी तरुणांसमोर कर्तव्यनिष्ठेचा आदर्श उभा केला आहे असे सांगितले.
माजी आ.भीमसेन धोंडे म्हणाले की, स्वातंत्र्य सेनानी काॕ.तात्यासाहेब पोकळे हे कम्युनिस्ट विचारात जगले.पंचायत समिती सदस्य असताना त्यांना आपण पाठींबा दिला होता.त्यांचा आमच्याशी खुप स्नेह होता.त्यांना ९८ वर्षाचे आयुष्य लाभले. कल्याण पोकळे देखील समाजाची सेवा करत आहे.तात्यासाहेबांच्या पाठीमागे लोकांच्या कामात कल्याण असतो.
माजी आ.साहेबराव दरेकर म्हणाले की,कम्युनिस्ट पक्ष हा वारकरी,पैशाला कधीच किंमत देत नाही.बोलताना देखील लाकूड मोडले असे सरळ बोलायचे.समाजाने संत परंपरेचा वसा घ्यावा तात्यासाहेब पोकळे आणि मी १२ वर्षे पंचायत समितीत सोबत काम केले आहे.आई वडिलांची सेवा करणारीच माणसे मोठी झाली आहेत आसे सांगितले.
यावेळी सुशीलाताई मोराळे,दादासाहेब मुंडे, आण्णासाहेब चौधरी,राम खाडे, डॉ.मधुकर हंबर्डे, प्रविण घुले, बबनअण्णा झांबरे,अमोल तरटे, ह.भ.प.श्रीहरि पुरी महाराज, ह.भ.प. आदिनाथ आंधळे महाराज,एकनाथ गांगर्डे यांनी श्रध्दांजली अर्पण केली. दशक्रिया विधीस परमेश्वर शेळके,रमेश ढगे,प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते,माजी सरपंच बन्सीभाऊ पोकळे, अंकुश खोटे फौजी,डॉ.महेश नाथ,पत्रकार उत्तम बोडखे, पत्रकार प्रविण पोकळे,इंजि. प्रविण वारे,सरपंच तात्यासाहेब शिंदे,रामदास जगताप, संजय पोकळे,अमृत पोकळे,विक्रम पोकळे,आत्माराम फुंदे, रावसाहेब पोकळे,सदाशिव पोकळे,नवनाथ तांदळे, राधाकिसन पोकळे,हनुमंत शिंदे, हरिष हाथवटे, डॉ. श्रीनिवास पोकळे,मारुती पोकळे मामा आदि सामाजिक, राजकीय,शैक्षणिक,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.