आष्टी(प्रतिनिधी)-आज समाजातील प्रत्येक घटकातील माणूस आपापल्या कामांमध्ये व्यस्त असल्याने त्याचे मानवी शरीराकडे विशेष लक्ष दिसत नाही.त्यामुळे तो विविध व्याधींनी त्रस्त आहे.म्हणून समाजातील या व्याधी नष्ट करायच्या असतील तर राम प्रहारी अत्यंत प्रामाणिकपणे घराघरांत प्राणायाम,योग केल्याने माणसाचे शारीरिक व मानसिक संतुलन सुदृढ होते.आत्मविश्वास व आयुर्मान वाढते, असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले.
दि.२१ जून रोजी अनिषा ग्लोबल शैक्षणिक संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आ.धस बोलत होते.योग प्रात्यक्षिक करण्यासाठी नितीन आळकुटे हे होते.पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,जागतीक स्तरावर योगाचे महत्त्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पटवून दिले आहे.सध्याच्या काळात धावपळीचे जीवन झाले आहे.जो माणूस काम करतो त्यांना वेळ पुरत नाही.परंतु हे सर्व करतांना आपण आपल्या शरिराकडे लक्ष देणे गरजेचे असून प्रत्येकांनी आपल्यासाठी एक-दोन तास नियमित देणे गरजेचे असल्याचेही आमदार धस यांनी सांगितले.त्यांनी सर्वांना योगासने करुन दाखवत त्या योगाचे महत्त्व सांगितले.यावेळी तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे,माजी नगराध्यक्ष भारत मुरकुटे,संजय शिंगवी, डॉ.चंद्रकांत ढेरे,अँड.बाळासाहेब मोरे,इंजि.दत्तात्रय देशमुख,सरपंच अशोक मुळे,आत्माराम फुंदे,शहादेव नरवडे,विजय धनवडे, राजाभाऊ निकाळजे, नगर पंचायतचे सभापती शेख शरीफ,अँड.अविनाश निंबाळकर,किशोर झरेकर, बाबुराव कदम,बाळासाहेब घोडके,दिपक निकाळजे,कपिल अग्रवाल,राजेंद्र लाड यांच्यासह आदि उपस्थित होते.यावेळी योग शिक्षक व प्राणी मित्र नितीन आळकुटे यांचा गौरव आमदार सुरेश धस यांच्याहस्ते करण्यात आला.योग शिक्षक आळकुटे यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले.