spot_img
spot_img

शब्दगंध च्या वतीने शनिवारी जलधारा काव्य संमेलन

अहिल्यानगर (प्रतिनिधी): ‘शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने शनिवार दिनांक २१ जून २०२५ रोजी दुपारी ४ वाजता कोहिनूर मंगल कार्यालय,पाईपलाईन रोड, सावेडी येथे जलधारा काव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे” अशी माहिती शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे व संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली.
यावेळी शब्दगंध चे सभासद यांनी मिळवलेल्या विशेष प्राविण्याबद्दल सत्कार व पत्र लेखन स्पर्धा चे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.शब्दगंध च्या वतीने विविध सामाजिक व साहित्यिक उपक्रम राबविण्यात येत असून यावेळी आगळे वेगळे जलधारा काव्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.जलधारा काव्य संमेलना मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ९९२१००९७५० वर संपर्क साधावा.
जलधारा काव्य संमेलनामध्ये जास्तीत जास्त नवोदित साहित्यिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!