देवळाली (वार्ताहर) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज 13 मे रोजी जाहीर झाला असून यात सौ लक्ष्मीबाई शांताराम डोके समाज विकास प्रतिष्ठान सावेडी अहिल्यानगर संचलित न्यू इंग्लिश स्कूल
आल्हणवाडी ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर या विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेने शंभर टक्केची परंपरा याही वर्षी कायम ठेवली आहे दहावी मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी कु. ज्ञानेश्वरी नितीन भुकन (81.00 %)तर द्वितीय क्रमांक तांदळे सिद्धार्थ लक्ष्मण (80.80%) तृतीय क्रमांक ढवन प्रगती मच्छिंद्र( 79.60% )चतुर्थ क्रमांक चव्हाण शिवानी (79.00 %) पाचवा क्रमांक भूकन शुभम (76.20%) यांनी उत्तुंग यश मिळवले आहे परीक्षेत प्रविष्ट सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब डोके यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उद्देशून डोके साहेब म्हणाले की अशी स्वप्नाला गवसणी घालत राहा स्वतः पाहण्यात ही पहिली पायरी आहे असेच यश यापुढेही मिळणार अशी मला खात्री आहे हे मिळवलेले यश अप्रतिम आहे याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन .कधीही हार न मानता कायम पुढे जाण्याची प्रेरणा देणारे न्यू इंग्लिश स्कूल चे सर्व शिक्षकवृंद यांचेही खूप खूप अभिनंदन असून असेच यापुढेही कार्य करत रहा असे म्हणाले