आष्टी (प्रतिनिधी):- तालुक्यात यंदा नगदी पिक म्हणून कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर कांदा काढणी चालू आहे. पण, कांद्याला बाजारात कवडीमोल बाजार भाव मिळत आहे.कांदा दरात मोठी घसरण झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या उन्हाळ आणि लाल कांद्याला ४०० ते १४०० रुपये भाव मिळत आहे. मिळणाऱ्या दरातून झालेला खर्चही वसूल होत नसल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जाते. कांद्याचे भाव वाढण्यासाठी सरकारने प्रयत्न करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी हाेत आहे.अशी जर परिस्थिती मार्केटमध्ये असेल तर शेतकऱ्याचे काय होणार? , असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने राबराबून पिकवलेल्या कांद्याचे दर शेअरबाजाराप्रमाणे दररोज कोसळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.कांदा पिकाचा वाढलेला खर्च आणि मिळणारा भाव यात मोठी सध्या तफावत दिसत आहे. कांद्याला सध्या लागवडीपासून ते कांदा काढणीपर्यंत एकरी एक लाख रुपये खर्च होत आहे. साधारण एकरात २००-२५० गोण्या कांदा निघतो, कृषी उत्पन्न बाजार समितीत ४ रुपये पासून १४ रुपये पर्यंत भाव मिळाला ३ नं.९ रुपये दर मिळाला असा जर बाजार असेल तर ७० ते ८० हजार एकरी होणार आहेत आणि खर्च एक लाख रुपये म्हणजे शेतकऱ्याला तोटा होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. बरेच शेतकरी सध्या कांदा वखारीत आपला कांदा साठवत आहेत, पण अनेक शेतकऱ्यांनी याच वर्षी कांदा लागवड केली आहे. त्यांच्याकडे वखार सुद्धा नाही, मग अशावेळी कांदा विकण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्याय उरलेला नाही.दरात झालेल्या घसरण यामुळे शेतकरी संकटात सापडला असून चिंतेत आहे.एकीकडे उत्पादन खर्चात वाढ होत असताना मिळणाऱ्या दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
➡️ ७०० ते ८०० गोण्या कांदा विक्रीला खराब होऊ लागला दर घसरल्याने अर्थव्यवस्था खिळखिळी
बारमाही शेतकरी संकटात वाटचाल करीत आहेत. कधी अवकाळी पाऊस, तर कधी दुष्काळ, खताच्या आणि मजुरीच्या दरात झालेली मोठी वाढ, निसर्गाचा लहरीपणा यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे, त्यातच आता कांदा दरात अशी घसरण झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत अजूनच भर पडली आहे.माझा ७०० ते ८०० गोण्या कांदा विक्रीला असून दर घसरल्याने विक्री करता येईना कांदा दिवसेंदिवस कांदा खराब होऊ लागला आहे.केलेला खर्च निघणे ही मुश्कील झाले आहे.कांद्याचा एकरी वाढलेला खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यात मोठी तफावत होत आहे. त्यामुळे कांद्याला ३० रुपये किलो हमीभाव मिळाला, तरच शेतकरी या संकटातून बाहेर पडू शकतो.
– विष्णू तळेकर ( कांदा उत्पादक शेतकरी, देवळाली)