spot_img
spot_img

ह.भ.प.ज्ञानदेव माऊली तळेकर यांच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त ह.भ.प प्रकाश महाराज बोधले यांचे जाहीर हरिकीर्तन

आष्टी (प्रतिनिधी)- शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले व अक्षर ओळख नसताना ग्रंथ वाचन करून न चुकता वृध्देश्वर वारी करत वयाची शंभरी पार केलेले वयोवृद्ध आजोबा ज्ञानदेव तळेकर आजही कणखरपणे जीवन जगत आहेत.त्यांची आज मोठ्या थाटामाटात शतकपुर्ती होत आहे. त्यांच्या या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त शनिवार दि.३/५/२०२५ रोजी रात्री ८ते १०ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले (अ.भा.वा. मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष) यांचे जाहीर हरिकीर्तन होईल तरी या कीर्तन सेवेचा देवळाली व परिसरातील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा अशी विनंती आसाराम उर्फ अशोक तळेकर व परिवार यांनी केली आहे.
आष्टी तालुक्यातील देवळाली येथील ह.भ.प. ज्ञानदेव माऊली तळेकर यांचा
जन्म १९२३ साली शेतकरी कुटुंबात झाला.कसलीही अक्षर ओळख नसताना ग्रंथ वाचन,नामस्मरण करतात.गेली साठ वर्षापासून महिना एकादशी पायी वृद्धेश्वर वारी केली .कीर्तन ऐकून पहाटेच्या अंधारात परत यायचे.वृद्धेश्वर येथील वै ब्र. सदगुरु रघुनाथ महाराज उंबरेकर हे त्यांचे गुरु आयुष्यभर काबाड कष्ट केले
वयाची शंभरी पार केली तरीही अजून स्वतःचे काम स्वतःच करतात ते कधीच शाळेत गेलेले नव्हते तरी अखंड ग्रंथ वाचन करतात तसेच त्यांचे नामस्मरणही दररोज चालू असते यामधे हरीपाठ काकड आरती व ग्रंथवाचन इत्यादी
ते दररोज पहाटे उठून व्यायाम करतात
एवढे वय झाले तरी त्यांची स्मरणशक्ती अजूनही तल्लख आहे.आत्ता पर्यंत त्यांनी पंचक्रोशीतील भरपूर भाविकांनाऔ परमार्थात आणले असून पंचक्रोशीत भाविकांना त्यांच्याविषयी भरपूर आदरभाव आहे. त्यांचे नातू अशोक तळेकर हे कृषी सेवा केंद्र चालवतात त्यांनीही त्यांच्या क्षेत्रात तालुक्यातील कृषी विक्रेते तसेच शेतक ऱ्यांसाठी भरपूर उल्लेखनीय कामे केली आहेत.करत आहेत आज ते आष्टी तालुका कृषी संघटनेचे तालुकाध्यक्षपदी आहेत.तर कृषी दुकानाच्या माध्यमातून तालुक्यात त्यांना मोठी लोकप्रियता आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!