spot_img
spot_img

कामगारदिनी मजूरांवर काळाचा घाला : देविनिमगाव जवळ झालेल्या अपघातात ३ मजूर ठार तर २० जण जखमी

आष्टी(प्रतिनिधी) आज दि.१ मे रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास कडा ते देवीनिमगाव रस्त्यावर सासू सुनेच्या माळाजवळ मजूर वाहतूक करणाऱ्या वाहनाचा टायर फुटून मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत २२ मजूर प्रवास करत होते.
अपघातात श्रावणी विक्रम महाजन (वय १४), ऋतुजा सतीश महाजन (वय १६), व अजित विठ्ठल महाजन (वय १४) या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. याशिवाय दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उर्वरित ११ जणांवर कडा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेनंतर कडागावचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते अनिल तात्या ढोबळे, यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णवाहिकेच्या सहाय्याने रुग्णालयात दाखल केले. कडा, धामणगाव व देवीनिमगाव येथील ग्रामस्थांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यात सहभाग घेतला.या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेने सर्वत्र पंचक्रोशीतुन हाळ हाळ व्यक्त होतं आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!