कडा (प्रतिनिधी)आष्टी तालुक्यातील सालेवडगाव येथील भूमिपुत्र शेखर आदिनाथ दहातोंडे यांना महावितरण तर्फे देण्यात येणारा आदर्श कर्मचारी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे हा पुरस्कार माननीय जगदाळे साहेब (व्यवस्थापक कोकण विभाग) मा .चंद्रमाणी मिश्रा साहेब( मुख्य अभियंता कल्याण झोन )मा. पाटील साहेब (अधीक्षक अभियंता कल्याण सर्कल) यांच्याकडून शेखर दहातोंडे यांना आदर्श कर्मचारी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे
शेखर आदिनाथ दहातोंडे हे कल्याण महावितरण मध्ये ३ ऑक्टोबर २०१७ रोजी विद्युत सहाय्यक म्हणून नोकरी सुरू झाली त्यानंतर त्यांना तंत्रज्ञ म्हणून ३ ऑक्टोबर २०२०रोजी बढती मिळाली आणि वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून २०२३ रोजी बढती मिळाली आज त्यांना त्यांच्या आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श कर्मचारी म्हणून पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे
अंबरनाथ येथील पश्चिम न्यू कॉलनी शाखाचे शाखा अभियंता श्री वैभव भोईर साहेब व सहकारी कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे हा पुरस्कार वितरण सोहळा१मे२०२५ रोजी कल्याण येथे होणार आहे