spot_img
spot_img

शेतकऱ्यांला ह. भ. प .खलासे महाराज यांनी केला होता मदतीचा हात, शेतकऱ्यांनी केला महाराजाचा सत्कार

आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यात परतीच्या पावसाने पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. सप्टेंबर महिन्यामध्ये अचानक झालेल्या ढगफुटी पावसामुळे आष्टी तालुक्यातील कोहनी या गावातील शेतकरी बिबीशन भवर यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने 3000 कोंबड्या मृत व वाहून गेल्या परतीच्या पावसामुळे झालेल्या या नुकसानाचे प्रशासनाने साधी दखलही घेतली नाही मदतीचा हात मात्र दूरच, या शेतकऱ्याला झालेल्या प्रचंड नुकसानी मध्ये साथी हात बढाना … एक अकेला रहे जाये तो मिलकर बोज उठाना या उक्तीप्रमाणे ह .भ .प .खलासे महाराज यांनी फुल न फुलाची पाकळी म्हणून दहा हजार रुपयाची तात्काळ मदत करून छोटासा हातभार लावण्याचा प्रयत्न केला मात्र निद्रिस्त असलेल्या प्रशासनाने केवळ पंचनामे व चौकशीची बोळवण करून कसल्याही प्रकारचे सहकार्य केले नसल्याचे पूरग्रस्त शेतकरी भवर यांनी सांगितले. यावेळी शासन मदतीला धावले नाही मात्र कडा येथील ह. भ. प. खलासे महाराज यांनी भरीव मदत करून भवर यांच्या पाठीशी आपण खंबीर उभे आहोत हे दाखवून दिले असून त्यांच्या या उद्भवलेल्या परिस्थितीत केलेल्या मदतीचे सर्वत्र कौतुक होत असून त्याबद्दल त्यांचा आष्टी येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये सत्कार करण्यात आला यावेळी शेतकरी बिबीशन भवर, पत्रकार अविनाश कदम, निसार शेख, जावेद पठाण, सामाजिक कार्यकर्ते बबन शिंदे, प्रा.निरंजन हेळकर, सलीम पठाण आदी उपस्थित होते

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!