spot_img
spot_img

श्री क्षेत्र पिपळा येथे बुधवारी ह.भ.प.गणेश महाराज शिंदे यांचे हरी किर्तन

आष्टी (प्रतिनिधी): तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळा येथील श्री पिंपळेश्वर भगवान व श्री सय्यद हसन साहेब यांच्या स्मृती निमित्त आयोजित सप्ताहातील चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा प्रसिद्ध व्याख्याते,समाज प्रबोधनकार, कथाकार व झी टॉकीज फेम ह.भ.प.श्री प्रा.गणेश महाराज शिंदे यांची होणार आहे. गेली ३९ वर्षापासून गावातील हा अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू असून ४० व्या. वर्षातील चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा ह.भ.प.गणेश महाराज शिंदे यांची दि.१६ एप्रिल २०२५ रोजी रात्री.ठीक ९ वाजता होणार आहे.या किर्तन श्रवण करण्यासाठी श्री पिंपळेश्वर संस्थान पिंपळा व समस्त ग्रामस्थ मंडळ पिंपळा, सुंबेवाडी, काकडेवाडी व धनगरवाडी यांचे वतीने परिसरातील सर्व टाळकरी, माळकरी भाविक मंडळी, तरुण, ज्येष्ठ पुरुष व महिला यांना विनम्र विनंती करण्यात येत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!