म्हसोबावाडी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा या गावातील ग्रामपंचायत सदस्य स्व. हरीओम घोडके हे कट्टर आ.आजबे समर्थक असुन ते राष्ट्रवादी पक्षाकडुन ग्रामपंचायतीमध्ये प्र.१ या वर्गातुन सदस्य या पदावर बहुमताने विजयी झाले होते अन् काही दिवसांपूर्वी दुदैवी अपघाती मृत्यू झाला अन् कोणत्याही राजकीय पदावराचा उमेदवार मध्यंतरी हे जग सोडुन गेला असता त्या जागी फेर पोटनिवडणुक घेऊन ती जाग्याची भर काढायची असते असे संविधान सांगते कारण हा देश लोकशाहीवर चालतो, अन् त्या अनुषंगाने या ही जाग्याची पोटनिवडणूक आली असता राज्यव्यापी सुरू असलेल्या मराठा आरक्षणाचा प्रभाव या ही पोटनिवडणूकीवर पडलेला दिसुन आला कारण स्व.हरीओम घोडके हे नेहमीच आजपर्यंत मराठा आरक्षणावर झालेल्या प्रत्येक उपोषण अथवा आंदोलन यामध्ये हे सक्रिय होते नेहमीच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत होते त्यामुळे त्यांच्या पाच्छात त्यांच्या ग्रामपंचायत सदस्य या पदावर होणाऱ्या पोटनिवडणुकी बाबत त्यांचे छोटे बंधु शिवम घोडके यांनी बहिष्कार टाकला यापेक्षा स्व.हरीओम घोडके यांना चांगली श्रध्दांजली असुच शकतं नाही असे ते म्हणाले अन् त्यांच्या या निर्णयावर सरपंच उपसरपंच व सर्वपक्षीय सदस्य आणि सकल मराठा समाज सुलेमान देवळा यांच्या या बैठकीत शिक्कामोर्तब झाला अन् दि.२५ ऑटोबर रोजी पोटनिवडणुकीवर घातलेल्या बहिष्कार व सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गाव बंदी या संदर्भात आष्टी तहसीलदार साहेबांकडे दिले निवेदन.