आष्टी (प्रतिनिधी) आष्टी शहरात जैन धर्मातील महान तीर्थंकर यांचा जन्मदिवस म्हणून महावीर जयंती आष्टी शहरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. शहरातील आज गुरुवार दि.१० एप्रिल रोजी महावीर जंयतीनिमित्त दिवसभर कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय आष्टी नगर पंचायतच्यावतीने घेण्यात आला असल्याची माहिती आष्टी नगर पंचायतचे नगराध्यक्ष जिया बेग यांनी दिली.
आष्टी शहरात जैन धर्मातील महान तीर्थंकर यांचा जन्मदिवस म्हणून महावीर जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार असून जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याच पार्श्वभूमीवर शहरातील
गुरुवार दि. १० एप्रिल रोजी महावीर जयंती साजरी होणार आहे.यामुळे आष्टी शहरातील गुरुवार दि.१० एप्रिल रोजी महावीर जंयतीनिमित्त दिवसभर कत्तलखाने व मटण,चिकन,मासे, विक्री करणारे सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. मांसविक्री होणार नाही.असा निर्णय आष्टी नगरपंचायत यांनी निर्णय घेतला आहे.या आदेशाचे विक्रेत्यांनी पालन करावे असे आवाहनही नगराध्यक्ष जिया बेग यांनी केले आहे.