spot_img
spot_img

१२ एप्रीलपासून देवळालीत भैरवनाथ यात्रोत्सवाला सुरुवात ————————————– कुस्त्यांचा भरणार जंगी आखाडा

आष्टी (प्रतिनिधी)आष्टी तालुक्यातील देवळाली येथील जागृत देवस्थान भैरवनाथाचा यात्रोत्सव सालाबाद प्रमाणे याही वर्षी शनिवार १२ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे भैरवनाथ यात्रोत्सवानिमित्त पैठण व नागतळा येथून गंगेचे पाणी आणण्यासाठी तरुण कावडी घेऊन जातात चैत्र पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी भैरवनाथ यात्रेला सुरुवात होते नवसाला पावणारा व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवळाली येथील भैरवनाथाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक येतात ढोल ताशाच्या गजरात पैठण व नागतळा येथून आणलेल्या गंगेच्या पाण्याच्या कावडींची मिरवणूक गावातून निघते नंतर कावडीने आणलेल्या पाण्याने भैरवनाथाला अभिषेक केला जातो आणि यात्रेला सुरुवात होते यात्रेनिमित्त घरोघरी आलेले पाहुणे आणि मित्र स्नेह भेटीची जणू आनंद पर्वणीच असते कावडीने पाणी आणण्यासाठी गेलेल्या भाविकांना येताना अमरापूर येथील चौधरी कुटुंब जेवणाची सोय करते भैरवनाथ मंदिरात गुळाची शेरनी आणि आंबील घुगर्याचा प्रसाद वाटप होतो बापू मियां यांच्या दारातून नवीन कापड गलप संदल घेऊन सर्व गावकरी पीर बाबाला गलप व चादर चढतात तेथून भैरवनाथ मंदिराकडे येतात आणि मंदिरासमोर ठेवलेल्या देवाच्या छबिना घोड्याला नवीन कापड फुलांचा हार आदी साहित्याने सजावट करून रात्री वाजत गाजत गावातून छबिण्याची मिरवणूक निघते छबीना मिरवणुकीत लेझीम पथक ढोल पथक बँड पथक सहभागी होतात कावडी व छबिना मिरवणुकी मध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो भैरवनाथ मंदिरापासून ते चैतन्य स्वामी मंदिरासमोर येते स्वामीच्या मंदिराजवळ आल्यानंतर शोभेच्या फटाक्यांची अतिशय सुंदर नयनरम्य अशी आतिषबाजी होते दुसऱ्या दिवशी हजर्याचा कार्यक्रम होतो विविध खाऊच्या दुकानांनी व खेळण्याचे दुकानांनी परिसर फुलून जातो दुपारी कुस्त्यांचा कार्यक्रम होतो व यानंतर यात्रेची सांगता होते

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!