spot_img
spot_img

धामणगाव येथे नरहरी मल्टीस्टेटचे उद्घाटन संपन्न ————————————— आर्थिक शिस्त पाळणार्‍या वित्तीय संस्था यशस्वी – ह.भ.प.कराड महाराज

आष्टी (प्रतिनिधी)
ज्या वित्तीय संस्थांनी आर्थिक शिस्त पाळली त्या संस्था यशस्वी झाल्या आहेत.
आर्थिक शिस्त पाळणे खूप महत्त्वाचे असल्याने त्यात कोणतीही तडजोड नसावी:-सरपंच मनोज गाढवे

ज्या वित्तीय संस्थांनी आर्थिक शिस्त पाळली त्या संस्था यशस्वी झाल्या आहेत. आर्थिक शिस्त खूप महत्त्वाची असल्याने त्यात कोणतीही तडजोड नसावी असे स्पष्ट मत हभप कराड महाराज यांनी व्यक्त केले. नरहरी मल्टीस्टेट या संस्थेने व्यवहारासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत, या धामणगाव पानाचे येथील क्रमांक तीनच्या शाखेचे उद्घाटन हभप कराड हभप महाराज व हभप रघुनाथ महाराज चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
धामणगाव सारख्या ग्रामीण भागात पतसंस्था स्थापन करून शेतकरी व्यापारी व बेरोजगारांना कर्ज देऊन मोठी झेप घेणार आहोत, असे बँकेचे संस्थापक धीरज मैड यांनी सांगितले, स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले त्यामुळे सर्वसामान्यांना कर्ज मिळू लागले पतसंस्थांनीही ग्रामीण भागात संस्था काढून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. आज झपाट्याने जग बदलत आहे. टेक्नॉलॉजी आत्मसात करून संस्थेसह अनेकांची भरभराट होईल. रोजगाराची निर्मिती पतसंस्थांनी केली, ही चळवळ अधिक जोमाने वाढण्यासाठी सहकार्य करावे. ठेवीदार कर्जदार यांची सांगड घालून पतसंस्था चालविल्या जातात. ग्रामीण भागात पतसंस्था स्थापन करण्याचे धाडस धीरज मैड यांनी केले आहे. त्या माध्यमातून त्यांनी अनेकांना संधी निर्माण करून दिली. आज नरहरी मल्टीस्टेट या संस्थेचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. यास आर्थिक शिस्त व संचालक मंडळातील एकमत महत्वाचे ठरले आहे. स्पर्धेच्या युगात काळाबरोबर बदलावे लागते व्यापारी ग्राहकांना घरबसल्या सुविधा निर्माण झाल्याने वेळेची मोठी बचत झाली असून, वेळेचे नियोजनास अनन्य साधारण महत्व असल्याने त्याचा अंगीकार करावा एसबीआय बँकेचे मॅनेजर राहुल पवार यांनी स्पष्ट केले.
पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष धिरज मैड म्हणाले की आम्ही काळानुसार बदलत चालल्याने संस्था प्रगती करू लागल्या आगामी काळात मनुष्यविरहित संस्था राहतील इतक्या योजना यात आलेल्या आहेत नरहरी मल्टी स्टेट ठेवीदार व ग्राहकांचा विश्‍वास संपादन केल्याने कोट्यावधी रुपयांच्या ठेवी वाढले आहे शाखांचा विस्तारही करावा लागला अहिल्यानगर सारख्या ठिकाणी शाखा उघडाव्या लागल्या, संस्थेच्या कार्यप्रणालीचा आढावा सांगितला व्यावसायिक ग्राहकांना नवीन कार्यप्रणाली व क्यू आर कोड उपलब्ध करून देऊ व व्यापार्‍यांना अधिक सुलभता आणण्याचे प्रयत्न करू, असे त्यांनी नमूद केले. यावेळी हभप रघुनाथ महाराज, हभप कराड महाराज यांच्या शुभहस्ते व , सरपंच मनोज गाढवे, सतीश झिंजुर्के, सुदाम काका झिंजुर्के, नरहरी मल्टीस्टेट चे संस्थापक धीरज मैड यांच्या उपस्थितीमध्ये फित कापून उद्घाटन करण्यात आले, यावेळी धामणगाव शाखेचे मॅनेजर सुदर्शन झिंजुर्के, हभप भागचंद झांजे महाराज, एसबीआय बँकेचे मॅनेजर राहुल पवार सर, सिईओ योगेश थोरात, तिसगाव शाखेचे मॅनेजर अकील सय्यद, व सर्व कर्मचारी, या संस्थेचे अधिकारी कर्मचारी धामणगाव येथील सर्व व्यापारी बांधव उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!