spot_img
spot_img

आष्टीत महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ११५ रक्तदात्यांनी केले रक्तदान ————————————— क्रांती बहुउद्देशीय सेवा भावी संस्था व रावण सोशल फाउंडेशनचा स्तूत्य उपक्रम

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी शहरातील सामाजिक संस्था क्रांती बहुउद्देशीय सेवा भावी संस्था व रावण सोशल फाउंडेशन या संस्थेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर या गुरू शिष्यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि ६ एप्रिल रोजी आष्टी येथील ॲड बी डी हंबर्डे महाविद्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आष्टी तालुका वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड किशोर निकाळजे, पत्रकार मारूती संत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरात ११५ युवक रक्तदात्यांनी रक्तदान केले.आष्टी शहरात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी क्रांती बहुउद्देशीय सेवा भावी संस्था व रावण सोशल फाउंडेशन या संस्थेच्या वतीने गुरू शिष्यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये ११५ युवक रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी आयोजक संस्थापक अध्यक्ष सुहास पगारे, वीरेंद्र निकाळजे, विजय शिंदे,गौरव निकाळजे,ओम लष्कर, सौरभ निकाळजे, कुणाल निकाळजे, सनी मस्के, शाहू निकाळजे, ॲड.विशाल कांबळे, संदीप पगारे, गोरख निकाळजे आदींनी परिश्रम घेतले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!