spot_img
spot_img

एन.एम.एम.एस. स्कॉलरशिप परीक्षेत श्री पिंपळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा या शाळेचे घवघवीत यश

आष्टी (प्रतिनिधी): तालुक्यातील पिंपळा येथील श्री पिंपळेश्वर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा या शाळेचा स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एन. एम.एम.एस.परीक्षा सन २०२४-२५ यावर्षीचा निकाल सर्वोत्कृष्ट लागला आहे. यामध्ये इयत्ता आठवीतील एकूण 18 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यापैकी पाच विद्यार्थी परीक्षेमध्ये पास झाले.,त्यामधून जिल्हा स्तरावरून उत्कृष्ट गुणांकन यादीमध्ये तीन विद्यार्थी पात्र ठरले. 1)सोनवणे श्रावणी रोहिदास 2)कौसे अमित कृष्णा व 3)काकडे तनुजा दत्तात्रय(सारथी )यांना एकूण प्रत्येकी 48 हजार रुपये स्कॉलरशिप मंजूर झाली.जिल्ह्याच्या गुणांकन यादीमध्ये सोनवणे श्रावणी ही क्रमांक पाच वरती व कौसे अमित हा क्रमांक आठ वरती आहे यांच्या उत्कृष्ट व अथक परिश्रमातून यांना हे यश संपादन करता आले.त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक पालक व सर्व सहकारी, विद्यार्थ्यांचे संस्थेचे सर्वेसर्वा अध्यक्ष सन्माननीय मा. आमदार भीमराव धोंडे साहेब तसेच छत्रपती संभाजी नगर विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ.अजय दादा धोंडे तसेच लोणी गटनेते सरपंच सावता शेठ ससाने यांनी अभिनंदन केले. सरपंच,उपसरपंच सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य विधाते व्हि.डि.सर्व शिक्षक वृंद श्री पिंपळेश्वर संस्थान पिंपळा तसेच समस्त ग्रामस्थ मंडळी पिंपळा, काकडेवाडी,सुंबेवाडी, धनगरवाडी व ठोंबळ सांगवी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले…

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!