आष्टी (प्रतिनिधी):- तालुक्यात मागिल २ दिवसांपासून दमट वातावर निर्माण होऊन उकाड्याने नागरीक हैराण झाले होते.अशातच रविवार पासुन ढगाळ वातावरण निर्माण झाले व सोमवारी अनेक भागांत दुपारनंतर वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. मंगळवारी आज देखील सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने सुर्य दर्शन देखील झाले नाही.रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे काही भागातील फळबागांसह गहु,कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिल्यामुळे फळबाग व शेतातील पिके असलेल्या शेतकऱ्यांची धास्ती वाढली वादळी वारा आणि विजेचा कडकडाटात काही ठिकाणी रिमझिम, तर काही ठिकाणी हलक्या सरी झाल्याचे चित्र होते. या अवकाळी पावसाने मागील तीन महिन्यापासून उन्हाच्या तापलेल्या वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या अवकाळीपासून काही शेतकऱ्यांचे शेत पिकांचं थोडेफार प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान वादळी वाऱ्यामुळे महावितरणने काही भागातील वीज पुरवठा बंद केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली रात्रभर विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
तालुक्यात तापमानात २ दिवसांपासून घट झाली होती.व ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.त्यामुळे उष्णतेच्या झळांची तीव्रता मागील काही दिवसांच्या तुलनेत कमी झाली होती. परंतु रविवार दि.३० मार्च रोजी दुपारपासून वातावरणात अचानक बदल जाणवायला सुरुवात झाली.ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने वातावरणात प्रचंड उकाडा वाढला. उन्हांच्या झळांनी अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. दरम्यान, ४ वाजण्याच्या सुमारास विजांच्या गडगडाट सुरू झाला. त्यानंतर काही गावांमध्ये पावसाच्या हलक्या सरी देखील कोसळल्या आष्टी, कडा, देवळाली,पांढरी,पोखरी,मातकुळी,क-हेवडगांव ,वाडी,हाजीपूर या गावांसह परिसरात वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्या मध्यरात्री पर्यंत काही भागात कडकडाट आणि वादळीवारे सुरू होते.दरम्यान, या पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दरम्यान, हवामान विभागाने विजांच्या कडकडाटासह काही भागांत पावसाचा अंदाज दिला आहे.वातावरणातील बदलाचा मोठा फटका कांदा,आंबा, लिंबू फळबाग उत्पादनावर झाला आहे. त्यातच आता पावसाचा अंदाज दिल्यामुळे आंबा,कांदा,लिंबू, डाळिंब बागायतदारांची चिंता वाढणार आहे.या अवकाळी पावसाने मागील तीन महिन्यापासून उन्हाच्या तापलेल्या वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या अवकाळीपासून काही शेतकऱ्यांचे शेत पिकांचं थोडेफार प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान वादळी वाऱ्यामुळे महावितरणने काही भागातील वीज पुरवठा बंद केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती.
➡️ कांदे व इतर पिके झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
सोमवारी व मंगळवारी दुपारच्या सुमारास शहरासह तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतात ठेवलेल्या कांदा पिक व इतर पिके झाकण्यासाठी शेतकरी राजाची धावपळ उडाली
➡️ पुढील ५ दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस
पुढील ५ दिवस विविध भागांमध्ये वादळी पावसाची व गारपीटीची शक्यता असल्याने हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.याचा शेत पिकांना नुकसान होण्याची शक्यता आहे. कांदा पिक काढलेल्या शेतकऱ्यांनी भिजणार नाही,फळबागंची देखील काळजी घ्यावी विजांपासून देखील स्वतःची काळजी घेणे व सावधानता बाळगणे देखील गरजेचे आहे.
– गोरख तरटे ( तालुका कृषी अधिकारी,आष्टी )