देवळाली (वार्ताहार) आष्टीतालुक्यातील अंभोरा हद्दीतील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ एक ट्रक ( क्र. MH21X 8600 ) हा धामणगाव कडून अहमदनगर दिशेने जात होता. रात्री साडे अकरा वाजेदरम्यान व्यंको कंपनीकडे डाव्या बाजूने वळण घेत असताना ट्रकला पाठीमागून आलेल्या रुगणवाहिकेने (क्र. MH 16Q9507 ) जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालक भरत सिताराम लोखंडे, वय 35, रा. धामणगाव ता. आष्टी, मनोज पांगु तिरकुंडे, पप्पु पांगु तिरकुंडे, दोन्ही रा. जाट देवळा, ता. पाथर्डी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर डॉ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के, वय 35, रा. सांगवी पाटण, ता. आष्टी यांचा मॅक केअर हॉस्पीटल, अहमदनगर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्याच बरोबर ज्ञानदेव सर्यभान घुमरे वय 45 रा घाटा पिंपरी ता आष्टी हेगंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर मॅक केअर हॉस्पीटल अहमदनगर येथे उपचार चालु आहेत.अपघाताची माहिती मिळताच सपोनि. ढाकणे,
पोउपनि सातव, सफौ./रोकडे, पोशि/केदार, शिरसाट, चालक पोशि/कांबळे यांनी घटनास्थळी पोहचून जखमींना अहमदनगर येथे दवाखान्यात रवाना केले.