देऊळगाव(प्रतिनिधी). १ एप्रिल पासून सुरू होणाऱ्या सोनी मराठी या टीव्ही वरती कोण होणार महाराष्ट्राचा लाडका युवा कीर्तनकार यासाठी आष्टी तालुक्यातून सचिन महाराज मस्के सावरगावकर यांची निवड झालेली आहे.
सचिन महाराज मस्के हे जोग वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथे शिक्षण घेत आहेत. सचिन महाराज मस्के हे गुरुवर्य श्री ज्ञानेश्वरी कंठभूषण ह भ प कृष्णा महाराज रासने यांच्यामुळे वारकरी संप्रदायात आले आहे. जेव्हा एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा कीर्तनासाठी उभा राहतो, आणि तो टीव्ही वरती दिसतो, तेव्हा एका शेतकऱी बापाचा उर अभिमानाने भरून येतो.
आज जगामध्ये पाहिलं तर नववी दहावीच्या वर्गातील मुले व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत, पण याच वयात सचिन महाराज मस्के सावरगावकर आज कीर्तन करतात हे कोणाच्यातरी आशीर्वादाचीच पुण्याई म्हणावे लागेल.
➡️ *आज माझ्या वयातील मुले, व्यसनाच्या आहारी गेले आहेत. पण मी याच वयामध्ये एवढ्या मोठ्या स्टेज वरती कीर्तन करण्याचा योग आला, यामागे माझे आई-वडील आणि बडे बाबा मच्छिंद्रनाथ यांचा मोठा कृपाशीर्वाद आहे*..
– *सचिन महाराज मस्के सावरगावकर* –