आष्टी (प्रतिनिधी):- संगणक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नयेत, या उद्देशातून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद राज्य प्रकल्प संचालक यांनी आयसीटी हा उपक्रम राबवण्याचे ठरवले असून समग्र शिक्षा अंतर्गत जिल्ह्यातील निवडक शाळांना संगणक प्रयोगशाळेसाठी संगणक लॅब दिल्या आहेत.विद्यार्थांना शिकवण्यासाठी स्वतंत्र संगणक प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात आली असून त्यामुळे खेड्यातील विद्यार्थ्यांनाही संगणक प्रयोगशाळेच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचे धडे मिळत असून विद्यार्थ्यांची रुची वाढवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा निश्चित फायदा होईल असे मत मा.भगवान फुलारी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी व्यक्त केले.
राज्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानासह संगणकाचे ज्ञान मिळावे, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेने राज्य प्रकल्प संचालक यांनी आयसीटी हा उपक्रम राबवण्याचे ठरवले असून समग्र शिक्षा अंतर्गत जिल्ह्यातील शाळांना संगणक लॅब दिल्या आहेत.अनलिमीटेड इंटरनेट सेवा दिली जात आहे.तसेच संगणक प्रशिक्षक देखील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञानार्जन करण्याचे काम करत आहेत. समग्र शिक्षा अभियानांतर्गत मिळालेल्या संगणक प्रयोगशाळेच्या माध्यमातून प्रोजेक्टर च्या माध्यमातून सर्व विषयाचे ऑनलाइन अध्यापन विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. सध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे असून सर्वच ठिकाणी संगणकांचा वापर होत आहे. शालेय स्तरावरच्या विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणाचे धडे मिळणे आवश्यक आहे. आधुनिक काळात टिकायचे असेल तर संगणकाशी मैत्री करावी लागेल. हे उद्दिष्ट समोर ठेवून, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद राज्य प्रकल्प संचालक यांनी आयसीटी हा उपक्रम राबवण्याचे ठरवले असून समग्र शिक्षा अंतर्गत जिल्हा परिषद शाळांना या उपक्रमाचा जास्तीत जास्त फायदा होत आहे. आधुनिक तंत्रांचा वापर करून नेहमीच्या विषय शिकवण्यासाठी व विद्यार्थ्यांची रुची वाढवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा निश्चित फायदा होईल असे मत मा.भगवान फुलारी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी व्यक्त केले आहे. तसेच या उपक्रमासाठी शिक्षणाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.