spot_img
spot_img

कनिज फातिमा जोहरा (हूरजहाँ) हीचा पहिला रोजा पुर्ण

आष्टी (प्रतिनिधी) – मुस्लिम धर्माच्या पवित्र रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात मुस्लिम समाजातील लहान चिमुकल्यांना वगळून इतर सर्वांना रोजा (फर्ज) सक्तीचे असतात. परंतु घरात पालकांचे पाहून हे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा धरतात. आष्टी येथील अनिषा ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये UKG मध्ये शिक्षण घेत असलेली कनिज फातिमा जोहरा (हूरजहाँ) (वय 4 वर्ष) या लहान मुलीने आयुष्यातील पहिला रोजा कडक उन्हाळा सुरू असतानाही सोमवारी दिनांक 10 मार्च रोजी पुर्ण केला आहे. यावर्षीचा पवित्र रमजान महिना शनिवार दि. १ मार्च २०२५ रोजीच्या सायंकाळ पासून आरंभ झाला. कनिज फातिमा जोहरा (हूरजहाँ) हिने दिवससभर अन्नाचा कण व पाण्याचा एक थेंबही न घेता काटेकोर नियम पाळत आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वी पुर्ण केल्याबद्दल नातेवाईक व इतरांनी तीचे कौतुक करत पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!