आष्टी (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बीड जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या अंतर्गत दुग्ध अन्नप्रक्रिया प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांनी रविवारी आयोजित “एक पाऊल पुढे” या विशेष उपक्रमाला आष्टीतील औदुंबर नगर येथील स्थानिक महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी आपल्या कौशल्याचा उपयोग करून विविध स्वादिष्ट खाद्यपदार्थांची निर्मिती केली व फूड स्टॉलच्या माध्यमातून त्यांना विक्रीसाठी सादर केले.आष्टी येथील पंचायत समिती समोरील औदुंबर नगर, गुट्टे हॉस्पिटलच्या पाठीमागे झालेल्या या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून महिलांनी तयार केलेल्या पदार्थांची चव घेतली आणि त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे महिलांना स्वतःच्या उद्योगक्षमतेची जाणीव झाली असून, भविष्यात अशा संधी मिळाव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे. “एक पाऊल पुढे” या उपक्रमाने महिलांच्या आत्मनिर्भरतेला नवा उत्साह मिळवून दिला आहे.स्त्रीशक्तीच्या सन्मानार्थ अशा कार्यक्रमांचे आयोजन महत्त्वाचे असून, समाजाने त्यांना अधिकाधिक पाठबळ द्यावे, अशी भावना महिला उपस्थितांनी व्यक्त केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेखा कदम,मनिषा सायबर,अनुराधा केदारे दिपाली क्षिरसागर, मंदाकिनी सोले, वैशाली शिंदे, ज्योती कांबळे, अर्चना हजारे, दिव्या कदम,प्रिती कोठुळे,सुरेखा धोंडे, स्नेहल तांबे यांनी स्टाॅल लावून परिश्रम घेतले.यावेळी बबीता बोडखे,स्वाती गाडेकर, पल्लवी चौधरी,करूना पंढिरे,उषा दोडके, ढवळे मॅडम,ज्योती धोंडे, संगिता शाहिर, योगिता दोडके,पोर्णिमा निकाळजे,रोहिणी शेकडे, अनिता मोहळकर आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.