देवळाली(वार्ताहार) आष्टी तालुक्यातील देवळाली येथे दसऱ्याच्या दिवशी देवीच्या पालखीची मिरवणूक वाजत गाजत गावातुन काढून मंदिरापर्यंत आणली गेली,तेथे आल्यानंतर मंदिरातील देवी भक्ताच्या अंगावर झेप घेते, हा अविस्मरणीय क्षण पाहण्यासाठी भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थीत होते व नंतर देवीला पालखीत घालून वाजत गाजत सीमोलंघनासाठी माळरानावर नेले गेले व तेथे गेल्यावर देवीची आरती करून परत आल्यावर मंदिराभोवती वाजतगाजत पाच प्रदक्षिणा झाल्या नंतर देवी पलंगावर ठेवली गेली दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.पाचव्या दिवशी म्हणजे आश्विन शु. पौर्णिमेला (कोजागिरी पौर्णिमेला) देवीची मोठी यात्रा भरणार आहे. महाराष्ट्रातील भक्त मंडळी देवीच्या दर्शनासाठी मोठया संख्येने येतात या दिवशी, पैठण व नागतळा येथून कावडीने आणलेल्या पाण्याने देवीचा अभिषेक केला जातो, हा उत्सव घटस्थापनेपासुन कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालतो.यात्रेनंतर या सर्व कार्यक्रमाची सांगता होते