spot_img
spot_img

नारी शक्तीचा सन्मान म्हणजेच ८ मार्च जागतिक महिला दिन

आष्टी (प्रतिनिधी)कधी शौर्याची ढाल, कधी मायेची ऊबदार शाल, जगातील समस्त स्त्री वर्गाला तिच्या आत्मविश्वासाला सलाम “! जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार ८ मार्च हा ” जागतिक महिला दिन “ म्हणून निश्चित करण्यात आला. ‘ हमारी आंखो में ज्वाला है, आप हमे प्रकाश दो, हमारे हाथो में ये पृथ्वी है, आप हमे आकाश दो हमे ओर कुछ नहीं चाहिए व्यक्ती होने एहसास दो.न्युयॉर्क मध्ये जसा महिलांना आपल्या हक्कासाठी लढा द्यावा लागला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागला तसा मला अभिमानाने सांगावं वाटेनं की भारतात गरज पडली नाही कारण आहे डॉ. भीमराव आंबेडकर. यांनी लिहिलेलं संविधान भारतातील स्त्री ला सर्वं अधिकार समान करून तिला उच्चतम् दर्जा प्राप्त करून दिला. त्याबद्दल कोटी -कोटी नमन समाजामध्ये महिलांच्या बद्दल सकारात्मक बदल घडत आहेत पण कुठे तरी महिलांबरोबर अशा ही घटना घडत आहेत की ज्याने मन हेलकावून टाकत. अजूनही महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. स्त्री कडे पाहण्याची नजर ही ती एक उपभोगाची वस्तू आहे म्हणून पाहिलं जात पण तीही एक स्वतंत्र व्यक्ती आहे. ती या विश्वाची जननी आहे.,ती निर्माती आहे, ती एक कणखर नेतृत्व आहे, महिलांच्या विषयी सन्मान, आदर, प्रेम व्यक्त करणे हा या महिला दिनाचा हेतू होय. सिंधू संस्कृती मध्ये शेतीचा शोध हा महिलांनी लावलेला पाहायला मिळतो याचाच अर्थ महिला ही निर्माती आहे. भारत देशात कितीतरी कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या जसं की माँ साहेब जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, माता रमाई, ताराराणी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, इंदीराजी गांधी प्रतिभा ताई पाटील सुनिता विल्यम अशा किती तरी महिलांची नावे सांगता येतील की ज्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केल. आज सुद्धा प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. गरज आहे ती फक्त साथ देण्याची त्यांच्या पंखाना बळ देण्याची. ज्या घरातील महिला पुढे ते घर पुढे, ज्या गावातील माहिला पुढे ते गाव पुढे, ज्या तालुक्यातील माहिला पुढे तो तालुका पुढे असचं जिल्हा, राज्य आणि देश पुढे त्यामुळे महिलांना कमी न समजता त्यांच्या हातात एकदा सत्ता देऊन पाहा कसे परिवर्तन घडवून आणतात आज समाज कोणत्या दिशेने चाललेला आहे. दिशाहीन समाज झालेला आहे. आपल्या महापुरुषांनी दाखवून दिलेला मार्ग चुकले आहेत समतेचा, मानवतेचा संदेश विसरले आहेत. आपण प्रगतीकडे वाटचाल करत आहोत पण त्याचं बरोबर न्यायव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही. प्रशासनाचा धाक राहिलेला नाही. माझं तर मतं आहे एकदा सत्ता महिलांच्या हातात देऊन पाहा प्रशासन कस चालवायचं न्याय कसा करायचा हे महिलांना चांगलंच माहिती आहे. या जागतिक महिला दिना निमित्त आपण अशी अपेक्षा करू की महिलांचा सन्मान फक्त एका दिवसा पुरता नाही तर कायमच करावा. महिला दिनाच्या शुभेच्छा नाही दिल्या तरी चालतील पण सन्मान द्या कायम. ,
– सुवर्णा बाळासाहेब गिऱ्हे – अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड बीड

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!