spot_img
spot_img

आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम यांचा वाढदिवस ठिकठिकाणी उत्साहात साजरा, वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

आष्टी (प्रतिनिधी):-

आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दै.लोकमत, मराठवाडा साथी वृत्तपत्रांचे तालुका प्रतिनिधी अविनाश कदम यांचा वाढदिवस सालाबाद प्रमाणे विविध ठिकाणी तालुक्यातील गावातील मान्यवरांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सोशल मीडियाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दीर्घायुष्याची प्रार्थना करून तुमच्या लेखणीतून देव देश धर्माची सेवा घडो असे शुभेच्छा देताना म्हटले आहे.

आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार अविनाश कदम यांचा वाढदिवस २१ आॅक्टोंबर रोजी सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला ते नेहमीच दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने अनाथ, निराधार, गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मिष्टान्न भोजनाची व्यवस्था करुन सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवस साजरा करतात यावर्षी देखील अनाथ निराधार गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करुन वाढदिवस साजरा केला त्यांच्या अगोदरच्या रात्री पासून च शुभेच्छांचा वर्षाव होत होता सर्वात तडफदार निर्भिंड निपक्ष पत्रकार म्हणून त्यांनी आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे.आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्व उपेक्षित घटकांवर निर्भीडपणे लिखाण करीत असल्यामुळे आष्टी तालुक्यात मोठ्या वाचक वर्गासह चाहत्यांनाही कमी नाही.त्यांच्या लेखणीचा अनेक जण चांगलाच धसका घेतात कारण त्यांच्या लेखणीची धार तलवारीच्या धारेपेक्षाही अधिक आहे. पत्रकार क्षेत्रात मोठा दबदबा आहे.पत्रकार अविनाश कदम यांना तालुक्यातून अनेक गावातून मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव झाला. तसेच अनेकांनी वेगवेगळ्या शुभेच्छा प्रतिक्रिया देऊन आपल्या लेखणीतून यापुढे आष्टी तालुक्याला नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येकाला न्याय भेटेल ही अपेक्षा व्यक्त केली.त्यांच्यावर सर्व लहान-मोठ्यांनी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्वांनीच समक्ष भेटून एसएमएस व्हाट्सअप फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम अशा वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या आदल्या दिवशी पासूनच शुभेच्छांचा वर्षाव केल्यामुळे ते भारावून गेले होते. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना उपाध्यक्ष निसार शेख, जावेद पठाण, राजेंद्र लाड, आण्णासाहेब साबळे,मा.सरपंच विठ्ठल राख, समीर शेख, संतोष नागरगोजे,किरण शिनगिरे,अक्षय विधाते आदी उपस्थित होते.
चौकट

माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आलेल्या शुभेच्छांची मी भारावून गेलो इतक्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही सर्वांनी प्रेम दाखवल आज कळले मला मी आयुष्यात येऊन तुमच्या सारखी लाखमोलाची माणसे कमावली तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे माझा आनंद दिगुणीत झाला. तुमचे प्रेम यापुढे असेच कायम राहील यासाठी मी देवाकडे प्रार्थना करेल तसेच माझ्या लेखणीतून समाजातील अनेक उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील यासाठी मला वाटेल ते करायची गरज पडली तरी मी मागे हटणार नाही अशी ग्वाही देतो
– अविनाश कदम ( आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष)

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!