मुंबई(प्रतिनिधी) दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज नवी मुंबई शाळेतील विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे फलक लेखन शाळेच्या दर्शनी फलकावर सॉफ्ट पेस्टलच्या साह्याने आकर्षक पद्धतीने रेखाटले असून अनोखे अभिवादन दिले आहे.
मयुरेश महाडिक, विघ्नेश मुसळे,वंश कोळी, या विद्यार्थ्यांना फलक लेखन साकारले. यासाठी विद्यालयातील उपक्रमशील कलाशिक्षक श्री नरेश लोहार यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांना कागदावर चित्र काढणे आणि फलकावर चित्र काढणे यामधे खूप फरक आहे , याचे ज्ञान होणे गरजेचे आहे. या फलक लेखनासाठी एकूण साडेपाच तासांचा अवधी लागला. विद्यार्थ्यांनी केलेले अप्रतिम असे फलक लेखन शाळेच्या दर्शनी भागावर झळकत आहे.