आष्टी प्रतिनिधी : आष्टी,पाटोदा,शिरूर मतदारसंघात आ. सुरेश धस हे आष्टी विधानसभेच्या निवडणुकीत भूतो ना भविष्य असे विक्रमी मताधिक्याने निवडून आले असून जनसेवेत असलेले सर्वसामान्यांच्या अडीअडचणीच्या काळात सदैव तत्पर राहून त्यांच्या अडीअडचणी सोडविणारे नेतृत्व म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. अडचणीच्या काळात मदतीला धाऊन जाणाऱ्या आ.धस यांना नव्याने होणाऱ्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद देऊन पक्षश्रेष्ठींने न्याय द्यावा अशी मागणी सुरेश धस यांचे खंदे समर्थक बाळासाहेब निकम यांनी केली आहे.
आष्टी पाटोदा शिरूर कासार मतदारसंघातील जनतेने जातीपातीच्या राजकारणाला थरा न देता विधानसभा निवडणुकीत आ.सुरेश धस यांना बहूजन समाजाने ऐतिहासिक विजयी केले आहे.केंद्रात आणि राज्यात भाजपा मित्र पक्षाचे सरकार स्थापन करण्यासाठी आष्टी,पाटोदा,शिरूर मतदार संघातील जनतेने मोठा कौल दिला आहे.यामध्ये नवनिर्वाचित लोकनियुक्त आ.सुरेश धस यांचा सिहाचा वाटा आहे. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी नव्याने होत असलेल्या मंत्रिमंडळात संधी देऊन पक्षश्रेष्ठींनी न्याय द्यावा अशी मागणी हाकेवाडी ग्रामपंचायतचे बिनविरोध सदस्य आणि धामणगाव सेवा सोसायटीचे चेअरमन व दीपक हॉस्पिटलचे सर्वेसर्वा बाळासाहेब निकम यांनी केली आहे