देवळाली (वार्ताहार)श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या गांधी महाविद्यालय कडा येथील प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर 2023 च्या कालावधीत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले सदरील प्रक्रमाच्या अंतर्गत पर्यावरणाची ढासळलेली स्थिती मानवी हस्तक्षेप यांचा वन्य प्राण्यांच्या जीवनावरती होणारा परिणाम व ऱ्हास याबद्दल विद्यार्थ्यांना सखोल माहिती देण्यात आली
वन्यजीव सप्ताह निमित्त महाविद्यालया तर्फे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय विविध गटामधील चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धे अंतर्गत सहभागी विद्यार्थ्यांनी विविध वन्य प्राण्यांचे आकर्षक व मनोरंजक चित्र रेखाटले यामध्ये 700 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला
सदरील उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन एस राठी ,उप प्राचार्य डॉ. भंडारी जवाहरलाल तसेच विभाग प्रमुख प्रा. डॉ.रमेश आबदार प्रा.डॉ. जाधव सुदाम, प्रा.डॉ विशाल वैद्य व श्री .पवार एस.टी यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेसाठी चित्रकला शिक्षक श्री अनिल पोखरणा (मोतीलाल कोठारी विद्यालय) यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले सदरील उपक्रमाचे कौतुक श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या सर्व संचालकांनी केले.